Raksha Bandhan 2020: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि NCP खासदार सुप्रिया सुळे यांचे रक्षाबंधन सेलिब्रेशन (Watch Video)
यात कलाकार, क्रिडापडू, राज्यकर्त्ये हे देखील मागे नाहीत. रक्षाबंधनाचा आनंद साजरा करुन अनेकांनी सोशल मीडियावर त्याचे फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत.
आज सर्वत्र रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण अगदी उत्साहात साजरा होत आहे. यात कलाकार, क्रिडापडू, राज्यकर्त्ये हे देखील मागे नाहीत. रक्षाबंधनाचा आनंद साजरा करुन अनेकांनी सोशल मीडियावर त्याचे फोटोज, व्हिडिओज शेअर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी देखील बहिण-भावाच्या प्रेमाचा हा सण अगदी आनंदाने साजरा केला आहे. सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधन सेलिब्रेशनचा व्हिडिओ (Raksha Bandhan Celebration Video) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
"बहीण-भावातील नात्याचे बंध आणखी घट्ट करणारा सण, राखी पौर्णिमा.यानिमित्ताने माझे भाऊ अजित पवार दादा यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली," असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी राखी बांधतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. (भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्षाबंधनाच्या दिवशी खास शुभेच्छा!)
पहा व्हिडिओ:
बहिण-भावाचे प्रेम सांगणारा हा सण प्रत्येकासाठी अत्यंत खास असतो. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे अनेकांना भावाची-बहिणींची भेट घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधन सेलिब्रेशनसाठी व्हर्च्युअल माध्यमांचा आधार घेतला जात आहे. तर काही जणांना पोस्टाने राख्या, गिफ्ट्स पाठवले असतील.
दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे रुग्णालयातील नर्सने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना राखी बांधली.