Crime News: रक्षकचं झाला भक्षक! महिला पोलिस कर्मचाऱ्याकडे पोलिस अधिकाऱ्याने केली शरीर सुखाची मागणी

पोलिस अधिकाऱ्याने स्वतच्या पोलिस चौकीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेवून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

रक्षकचं भक्षक झाला आहे असाचं काहीसा संतापजनक प्रकार कोल्हापुरात घडला आहे. कायद्याचा रक्षक, सर्वसामान्यांचा रक्षक अशी पोलिस खात्याची (Police Department) ओळख. कुठे काही अनुचित घडल्यास, चोरी-चकरी, असुरक्षिता यासाठी पोलिस कायम देशाच्या नागरिकांच्या सेवेत असतात. पण ह्या रक्षकापासूनचं धोका असल्यास नेमक काय करायचं. कोल्हापूर नजिकच्या पन्हाळा तालुक्या माणुसकी आणि कायद्याला काळीमा फासेल सा प्रकार घडला आहे. तर या प्रकरणी अडचणीत असणारी कोणी सर्वासामान्य महिला नसुन खुद्द महिला पोलिस कर्मचारी आहे तर अडचण आणि त्रास देणारा देखील पोलिस कर्मचारीचं आहे. पोलिस अधिकाऱ्याने स्वतच्या पोलिस चौकीतील महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेवून शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

 

तरी या संबंधी महिला पोलिस कर्मचाऱ्याने  पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे (Shailesh Balkavade) यांच्याच्याकडे तक्रार दाखल केली असुन घडलेल्या प्रकाराची संपूर्ण विस्तारीत माहिती देण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकच्या (morning Walk) निमित्ताने रोज सकाळी तोकड्या चड्डीत ते पोलीस ठाण्यात येऊन अनावश्यक प्रश्न विचारणे, लज्जा उत्पन्न होईल असे भाष्य करणे व वर्तन करणे असे प्रकार करत असून माझ्याकडे त्याने वारंवार शरीरसुखाची मागणी केली असल्याचे आरोप महिला पोलीस कर्मचाऱ्याने केले आहेत. (हे ही वाचा:- Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील नवा खुलासा; जंगलात सापडलेल्या हाडांसोबत जुळले श्रद्धाच्या वडीलांचे DNA)

 

तरी घडलेल्या संबंधीत प्रकाराबाबत पोलिस अधिकक्षक संबंधित पोलिस अधिकाऱ्याबाबत काय कारवाई करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच महिला पोलिस कर्मचाऱ्यांकडून संबंधित बाबित लवकरात लवकर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा घडलेला सर्व प्रकार वरिष्ठ कार्यालय मंत्रालय आणि महिला आयोग यांना पाठवून मी माझ्या बाळाला घेऊन आत्महत्या करेल असा इशारा पिडीत महिला कर्मचाऱ्याने दिला आहे.