Coronavirus Update: मुंबई मध्ये कोरोनाचे 875 नवे रुग्ण; रुग्णांचा एकूण आकडा 13 हजार 564 वर, पहा ताजे अपडेट्स

यापैकी आज 212 जणांंनी कोरोनावर मात केली आहे तर 19 मृत्युंची नोंद झाली आहे. यानुसार मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजार 564 वर पोहचला आहे

प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) विभागात आज कोविड 19 (COVID19 ) चे 875 नवे रुग्ण आढळले आहेत.  यापैकी आज 212 जणांंनी कोरोनावर मात केली आहे तर 19 मृत्युंची नोंद झाली  आहे. यानुसार मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 13 हजार 564 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 508 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3004 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे आजच मुंबईच्या ऑर्थर रोड (Arthur Road) कारागृहातील 81 कैद्यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. यानुसार आतापर्यंत ऑर्थर रोड कारागृहात 26 कर्मचाऱ्यांसह 184 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. कोरोनाच्या रुग्णाच्या आकडेवारीनुसार, मुंबईचा संपूर्ण परिसर आता कोरोनाच्या रेड झोन मध्ये आहे. याशिवाय तुम्ही राहत असणारा जिल्हा रेड, ग्रीन आणि ऑरेंज पैकी कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

काहीच वेळापूर्वी मुंबई महापालिकेकडून ट्विटच्या माध्यमातून माहिती देत धारावीत 26 नव्या कोरोना बाधितांची भर पडल्याचे सांगण्यात आले होते तर आज 2 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याचेही सांगितले गेले होते. यानुसार एकट्या धारावीतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 859 वर पोहोचली असून 29 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समजत आहे. धारावी, वरळी हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत, मुंबईतील हे भाग कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणारे भाग ठरले आहेत. त्यामुळे या कंटेनमेंट झोन मध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 127 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले होते. सद्य स्थितीत भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु असून 19,358 रुग्ण बरे झाले आहेत तर एकूण 2109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.