Theobroma च्या मुंबईतील आउटलेटमध्ये पनीर रोलवर आढळले झुरळ; मुलुंड वेस्ट आउटलेटमधील घटना (Video)

मुंबईतील थिओब्रोमाच्या मुलुंड वेस्ट आउटलेटमध्ये पनीर रोलवर झुरळ रेंगाळत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. नागरिक संताप व्यक्त करत आहेत. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा तपासणीची मागणी करत आहेत.

PC-X

Cockroach Found over Paneer Rolls at Mumbai’s Theobroma Outlet: मुंबईतील मुलुंड वेस्टमधील थिओब्रोमाच्या (Theobroma) रुनवाल ग्रीन्स आउटलेटमध्ये पनीर रोलवर झुरळ रेंगाळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून लोक मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करत आहे. नागरिक त्या आऊटलेटच्या स्वच्छता आणि अन्न सुरक्षा तपासणीची मागणी करत आहेत. 6 जून रोजी, एका रेडिट वापरकर्त्याने आउटलेटमध्ये थांबून पनीर रोलच्या ट्रेवरून झुरळ सहज फिरत असल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. वापरकर्त्याने हे फुटेज इंटरनेटवर कॅप्शनसह अपलोड केले होते, "थिओब्रोमा येथे आम्ही हे पाहिले रुनवाल ग्रीन्स, मुलुंड वेस्ट, मुंबई."

This is what we saw in Theobroma: Runwal Greens, Mulund West, Mumbai

byu/Familiar-Guava-3123 inindiasocial

वापरकर्त्याने पुढे म्हटले, "मी आणि माझा मित्र ऑर्डर देणार होतो तेव्हा आम्ही हे पाहिले. आम्ही ट्रे बाहेर काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले, पण त्यानंतर काय कारवाई केली हे आम्हाला माहित नाही. सावधगिरी बाळगा मित्रांनो." ही पोस्ट व्हायरल झाली. यावर प्रतिक्रियांचा पूर आणला, वापरकर्त्यांनी रेस्टॉरंट्समधील त्यांचे स्वतःचे त्रासदायक अनुभव व्यक्त केले. एका वापरकर्त्याने शहरातील सर्वोत्तम रेस्टॉरंट्समध्ये लाल मुंग्या आळल्याचे म्हटले, "या देशातील लोक स्वच्छतेला गांभीर्याने घेत नाहीत."

दुसऱ्याने फ्रेंचायझिंग संकल्पनांचा निषेध करत म्हटले, "ब्रँड स्टोअर्सना फ्रँचायझी देतात आणि मालक यावर का लक्ष ठेवू शकत नाहीत? मालक आणि कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारी का नसते?" दक्षिण दिल्लीतील एका वापरकर्त्याने थेओब्रोमाच्या दुसऱ्या ठिकाणी झालेल्या एका अनुभवाबद्दल पोस्ट केले, जिथे त्याला ब्राउनीमध्ये प्लास्टिक सापडले आणि तो म्हणाला, "कर्मचाऱ्यांनी ते फेकून दिले आणि तरीही माझ्याकडून पैसे घेतले.

थेओब्रोमाकडून अद्याप प्रतिसाद नाही

मुलुंड पश्चिम येथील घटनेवर थेओब्रोमाने अद्याप कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. प्रतिसादाच्या अभावामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. कारवाईची मागणी करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement