MPSC Exam 2020: मराठा समाजाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवर घेतलेल्या भूमिकेबाबत आज होणार मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची बैठक
या सर्व गोष्टींचा विचार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्दयावर सरकार दुर्लक्ष करत असून आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्च्याचे तिसरे पर्व सुरु झाले. मराठा समाजाने आपले आंदोलन देखील अधिकच तीव्र केले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागत नाही राज्य सरकारने युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नये अशी मागणी मराठा समाज संघटनांकडून सरकारला करण्यात आली होती. मात्र तसे काही झाले नाही. याउलट सरकारने एमएससीच्या (MPSC Exam 2020) परीक्षांचा घाट घातला असून येत्या 11 ऑक्टोबरला ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे याबाबत मराठा समाजाने नाराजी व्यक्त आपले आंदोलन तीव्र करून या परीक्षा उधळून लावू असे सरकारला इशारा दिला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी आणि त्या परीक्षेसाठी लागणारी वयाची अट वाढवावी असे सांगितले आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही. मात्र तरीही येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा होत आहे. यामुळे ज्या ज्या ठिकाणी या परीक्षा होतील तेथे तेथे जाऊन या उधळवून लावण्याचा आमचा प्रयत्न असणार असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे मराठा समाज हा जितका संयमी आहे, तितकाच तो आक्रमकही आहे. याची जाणीव ठेवून सरकारने एमपीएससीच्या परीक्षेसाठी (MPSC Exam 2020) संपूर्ण मराठा समाजाला परीक्षा द्यायला लावून उद्रेकाची वाट पाहू नये, असे भाजप खासदार उदयनराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. यामुळे या सर्वांचा विचार करता मुख्यमंत्री या बैठकीत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.