CIDCO Diwali Scheme 2021: सिडकोकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनाची घोषणा, नागरिकांसाठी निवासी-वाणिज्यिक गाळ्यांची विक्री केली जाणार

त्यानुसार नवी मुंबईतील विविध नोडमधील सामाजिक उद्देशासह निवासी आणि वाणिज्यिक गळ्यांची विक्री केली जाणार आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Instagram )

सिडकोकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार नवी मुंबईतील विविध नोडमधील सामाजिक उद्देशासह निवासी आणि वाणिज्यिक गळ्यांची विक्री केली जाणार आहे. त्यानुसार नवी मुंबई येथील खारघर, पनवले, पुष्पक नगर नोडमधील भूखंड आणि नवी मुंबईच्या रेल्वे स्थानक संकुलासह सिडकोच्या गृहनिर्माण संकुलातील वाणिज्यिक गाळ्यांची विक्री केली जाणार आहे. तर नवी मुंबईतील बांधकाम क्षेत्रासह अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उचलण्यात आलेले हे महत्वाचे पाऊल असून याचा फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(MSRTC Employee Protest: राज्यात्त एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; ऐन दिवाळीत 250 पैकी 38 बस डेपो बंद)

सिडकोकडून विविध गोष्टींच्या कारणास्तव भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले जातात. तसेच आर्थिकदृष्टा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वत:चे घर विकत घेता यावे यासाठी त्यांच्यासाठी शिखाला परवडतील अशा किंमतीत घर उपलब्ध करुन दिली जातात. तर नव्या योजनेत उलब्ध करुन देण्यात आलेले हे गाळे सिडकोकडून विविध गोष्टींच्या कारणास्तव भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले जातात. तसेच आर्थिकदृष्टा दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना स्वत:चे घर विकत घेता यावे यासाठी त्यांच्यासाठी शिखाला परवडतील अशा किंमतीत घर उपलब्ध करुन दिली जातात. तर नव्या योजनेत उलब्ध करुन देण्यात आलेले हे गाळे बाजार आणि मोक्याच्या ठिकाणी असणार आहेत.  त्याचसोबत सामाजिक उद्देशांसाठी हे भूखंड उपलब्ध करुन दिले आहेत. सर्वसामान्यांना नवी मुंबईत आपल्या हक्काचे घर किंवा एखादा लहान प्रकल्प सुरु करण्यास मदत होते.

नवी मुंबईला उपनगरीय रेल्वे, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे यामुळे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. येत्या काळात साकार होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे नवी मुंबई थेट जगाला जोडली जाणार आहे. त्याचसोबत सिडकोतर्फे साकारण्यात येणाऱ्या मेट्रो प्रकल्पामुळे नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन सेवा अधिक सक्षम होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif