CIDCO August 2026 Housing Scheme Draw: सिडको च्या खारघर, कळंबोली, तळोजा मधील 4779 घरांची सोडत इथे पहा लाईव्ह (Watch Video)
सिडकोने ऑगस्ट २०२५ मध्ये न भरलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या (ईडब्ल्यूएस) ४,७७९ घरांसाठी ११ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता संगणकीय महासोडत काढली, ज्यामध्ये तळोजा, कळंबोली आणि खारघर येथील घरांचा समावेश आहे.
सिडको (CIDCO) कडून नवी मुंबई मध्ये खारघर, कळंबोली, तळोजा या भागात 4779 घरांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या लॉटरीची अर्ज आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अखेर आज ऑगस्ट 2026 च्या या हाऊसिंग स्कीम मधील अर्जदारांना निकाल पाहता येणार आहे. आज 11 सप्टेंबर दुपारी 4 वाजता सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनाच्या सातव्या मजल्यावर हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोडतीचं लाईच स्ट्रिमिंग देखील अर्जदारांना पाहता येणार आहे.
आज सोडतीमध्ये सिडकोचं घर लागले तर पुढे काय?
आज संगणकीय सोडतीत नाव आल्यानंतरही अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी आणि पात्रता तपासणी या टप्प्यांतून जावे लागणार आहे. यानंतर संबंधित अर्जदारांना पहिली सूचना पत्र (फर्स्ट इंटिमेशन लेटर) पाठवले जाईल, त्यानंतर तात्पुरते वाटप पत्र (प्रोव्हिजनल ऑफर लेटर) दिले जाईल. निर्धारित मुदतीत घराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच अंतिम ताबा दिला जाईल. सोडतीत निवड होणे म्हणजे अंतिम वाटप निश्चित झाले असे नाही, हे अर्जदारांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ज्या अर्जदारांना सोडतीत यश मिळणार नाही, त्यांना भरलेली बुकिंग रक्कम स्वयंचलितपणे परत केली जाईल.
सिडको ऑगस्ट 2026 च्या घरांचा निकाल पहा
सिडकोची नवी मुंबईत घरं किती?
सिडकोच्या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-३९ येथे सर्वाधिक ४,२२९ सदनिका उपलब्ध आहेत. याशिवाय कळंबोली बस डेपो परिसरात २५७ आणि खारघर बस डेपो परिसरात २९३ सदनिका देण्यात येणार आहेत. या योजनेतील काही सदनिका दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
सिडकोच्या घरांच्या किंमती किती
सिडकोने या घरांच्या विक्रीसाठी आपली वेबसाइट अद्ययावत केली असून, तिन्ही ठिकाणच्या घरांच्या किंमतीतही फरक आहे. सर्वाधिक घरे असलेल्या तळोजा येथील घराची किंमत सर्वात कमी, म्हणजे २३.५० लाख रुपये आहे. कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत ३७.७० लाख रुपये असून, खारघर बस डेपो येथील घराची किंमत सर्वाधिक, म्हणजे ४३.५० लाख रुपये आहे. खारघर येथील घराचे क्षेत्रफळ ३२२ चौरस फूट इतके आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2026 02:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

