मनुस्मृतीला विरोध केल्यास जीवे मारण्याची छगन भुजबळांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आलं आहे.

छगन भुजबळ (Photo Credits: PTI)

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र पाठवण्यात आलं आहे. "जर तुम्ही मनुस्मृतीला विरोध केला तर तुमचाही दाभोलकर, पानसरे करु..." अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. नाशिकमधील भुजबळ फार्म वर हे निनावी पत्र पाठवण्यात आलं असून यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नाशिकमधील पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन याबद्दल तक्रार दाकल केली आहे.

काही दिवसांपूर्वी भुजबळ नागपूरात म्हणाले होते की, "आम्हाला मनुस्मृती नको, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हवंय." तसेच त्यांनी मनुस्मृतीला विरोध दर्शवला होता. यावरुनच हे धमकीचे पत्र भुजबळांना पाठवण्यात आले असण्याची शक्यता आहे. मात्र धमकीचं पत्र मिळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भुजबळ फार्मकडे धाव घेतली आणि या पत्राची लवकरात लवकर चौकशी करण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Cyber Fraud Cases In Pune: पुण्यात एकाच दिवसात सायबर फसवणुकीच्या 10 वेगवेगळ्या घटनांची नोंद; पीडितांना लावला करोडो रुपयांचा चूना

Dispute Over Honeymoon Plans: जोडप्याच्या मधुचंद्राच्या ठिकाणावरुन कौटुंबीक वाद; जावयावर Acid फेकले, कल्याण येथील सासऱ्याचा कारनामा

Amol Kirtikar Vs Ravindra Waikar: अमोल कीर्तिकर यांना मुंबई उच्च न्यायालयाचा झटका; रवींद्र वायकर यांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली

Satta Matka Results: सट्टा मटका खेळून श्रीमंत व्हायचे असेल तर व्हा सावधान, या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif