Weather Forecast Maharashtra: मुंबईसह 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, जाणून घ्या आजचे हवामान अंदाज

काल मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होता. राज्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे.

Weather | (Photo Credits: ANI)

Weather Forecast Maharashtra: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. काल मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस होता. राज्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस आहे. पण काही ठिकाणी पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे शेतकरीराजा चिंतेत आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्याभरात येत्या 20 जून पर्यंत पाऊस येईल. हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा-पूण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज)

मिळालेल्या माहितीनुसार, आज शनिवारी कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकणात रिमझिम पावसाची शक्यता आहे. मुंबईत काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी ऊनाचे चटके भासत होते.

आज १५ जून रोजी मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान ३० अंश सेल्सियस आणि २६ अंश सेल्सियस आसपास राहिल. महराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक शहरात हलक्या सरी बरसणार आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा, छत्तीसगड, दक्षिण ओडीसा, सिक्कीम आणि आसाममध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे.