डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डिजिटल माध्यमातून साजरी करावी; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे, आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे.

Ajit Pawar (Photo Credit: Facebook)

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण महाराष्ट्रा संकाटात सापडले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे असे, आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. दरवर्षी नियमित पणे 14 एप्रिल रोजी अनेकजण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस (Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary) मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट उद्भवल्याने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती डिजिटल माध्यमातून साजरी करावी, असे आवाहन महाराष्ट्राचे (Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. तसेच बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया असेही अजित पवार म्हणाले आहेत.

भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या घरातच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर आणि कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया”, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशातून केले. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोनामुळे MPSC-UPSC ची परीक्षा देऊ न शकणाऱ्या आणि वयोमर्यादा संपणाऱ्या विद्यार्थ्यांना 1 वर्ष मुदतवाढ देणार? - उदय सामंत

तसेच राज्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनीही नागरिकांना घरातच बसून जयंती साजरा करण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील कोरोना व्हायरसचे संकट पाहता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुस्तकांचे वाचन करुन 14 एप्रिल हा दिवस 'वाचन दिन' म्हणून घरातच साजरा करावा. तसेच बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांनी अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. तसेच बौद्ध धम्माची दीक्षा दिली. महात्मा फुले यांचा जन्मदिन ज्ञानाचा दिवा लावून घरातच साजरा झाला. त्याप्रमाणेच आता बाबासाहेबांची पुस्तके वाचून त्यांची जयंती घरीच साजरी करा, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif