BMC COVID-19 Guidelines On New Year Celebration: ख्रिसमस, नववर्ष सेलिब्रेशन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीकडून निर्बंध; घ्या जाणून

मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नियमांनुसार रेसकोर्स, मोठी मैदाने यांसारख्या मोकळ्या जागा तसेच, हॉल आणि घरगुती कार्यक्रम यांवरही मर्यादा असतील. महापलिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनच्या जंगी कार्यक्रमांना केवळ 200 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल.

BMC | (File Photo)

राज्यात कोरोना व्हायरस (Celebration) संसर्गाचे प्रमाण घटते असले तरी सावट अजून दूर झाले नाही. अशातच ओमायक्रोन (Omicron) हा कोरोनाचा नवा स्ट्रेनही मोठ्या प्रमाणावर चिंता वाढवतो आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका (BMC) सावधगिरी बाळगताना दिसते आहे. त्यामुळे महापालिकेने आगामी ख्रिसमस (Christmas) आणि नववर्ष सेलिब्रेशन ( New Year Celebration) कार्यक्रमांवरही निर्बंध घातले आहे. मुंबई महापालिकेने जारी केलेल्या नियमांनुसार रेसकोर्स, मोठी मैदाने यांसारख्या मोकळ्या जागा तसेच, हॉल आणि घरगुती कार्यक्रम यांवरही मर्यादा असतील. महापलिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनच्या जंगी कार्यक्रमांना केवळ 200 लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. तसेच, एकूण जागेच्या 25% क्षमतेइतकेच लोक संबंधित ठिकाणी एकत्र येऊ शकतात. सार्वजकनिक ठिकाणे आणि घरगुती पार्ट्यांवरही पोलिसांची बारीक नजर असेल. लोकांनी स्वयंशिस्त बाळगावी. जेणेकरुन पोलिसांनी कारवाई करण्याची वेळ येऊ नये, असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटले आहे.

बीएमसीने जाहीर केलेली नियमावली

कोरोना संसर्ग आटोक्या येत असला तरी राज्यात ओमायक्रोन स्ट्रेनचा धोका वाढतो आहे. शेवटची अद्ययावत माहिती हाती आली तेव्हा, महाराष्ट्रात आठ नवे ओमायक्रोन संक्रमित रुग्ण सापडले. आजघडीला राज्यात ओमायक्रोन संक्रमीत रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रोन रुग्ण आहेत. यातील दिलासा देणारी बाबत इतकीच की ओमायक्रोन संक्रमित एकूण 40 रुग्णांपैकी 25 रुग्ण वैद्यकीय उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातील एकूण ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 109 इतकी झाली आहे.