Maharashtra: महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल माफ करणार नाही, निलेश राणे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले आहेत.

Nilesh Rane | (File Image)

आषाढी एकादशी निमित्त (Ashadhi Ekadashi 2021) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या कुटुंबासह विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला (Pandharpur) रवाना झाले आहेत. यावरून आता भाजपच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्या टीकेनंतर आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला विठ्ठल कधीच माफ करणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या कुटुंबासह पंढरपूरला रवाना झाले. परंतु, उद्धव ठाकरे स्वत: कार चालवत असल्याने सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु झाली. यावर निलेश ऱाणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "जो माणूस महाराष्ट्र हातात येऊन चालू शकला नाही तो माणूस गाडी चालवत मुंबईबाहेर गेला तर त्यात काय मोठा पराक्रम??? विठ्ठलाची कितीही सेवा केली तरी या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही कारण इतक्या सहज पणे महाराष्ट्राची वाट लावणाऱ्या व्यक्तीला माफी नाही", असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Mumbai: महापौर Kishori Pednekar यांच्या मृत्यूच्या बातमीची अफवा; 'मी आत्ताच दाल-खिचडी खाल्ली' म्हणत चुकीचे वृत्त देणाऱ्या माध्यमांना फटकारले

ट्विट-

याआधी केशव उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. "जनतेचे जिणे हराम, मुख्यमंत्र्यांचे घरातून काम. पावसाने मुंबईचा चक्का जाम, मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. एमपीएससी विद्यार्थ्याचा जीवनाला रामराम, तरीही मुख्यमंत्र्यांचे घरातूनच काम. तुका म्हणे माझा विठ्ठल झाकोळला. वारकरी भक्तांना बसवुनी घरी, फोटोमध्ये झळकती मुख्यमंत्री" अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केली आहे.