Bhandara Unseasonal Rain: भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका, शेतकरी चिंतेत

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

भंडारा (Bhandara) जिल्ह्यात पावसाने अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने शेत पिंकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी (Farmers) वर्ग चिंतेत पडला आहे. भंडारा जिल्ह्यात आज सकाळी हलक्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यातच आज सकाळी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  तर सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू आहे. त्यामुळे भात पिकाला या पावसाचा फायदा होणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा)

राज्यात आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

नागपूरसह पूर्व व पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी आज अवकाळी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात किमान तापमान पुढील काही दिवस 1 ते 2 अंशांनी घसरणार असून विदर्भात पुढील 5 दिवस किमान तापमानात कोणताही बदल होणार नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याने म्हटले.