बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृण हत्या
बीड येथील परळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
बीड (Beed) येथील परळीच्या (Parli) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड (Pandurang Gaikwad) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. रविवारी (24 मार्च) रात्री काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर तलवारीने वार करत हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. परळी येथील उड्डाणपुलाखाली त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर तलवारीने 20 हून अधिक वार करण्यात आले. पांडुरंग गायकवाड हे परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक होते. तर पत्नी मीनाबाई गायकवाड या परळी येथे राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत.
या हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र राजकीय वादातून हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा आहे. हल्ल्यातील मारेकरी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.