Ban Use of Drones, Other Flying Objects in Mumbai: मुंबई मध्ये G20 Meetings च्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून फ्लाईंग अ‍ॅक्टिव्हिटी वर बंदी

मुंबई पोलिसांकडून aerial surveillance लागू असणार आहे.

Mumbai Police | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

मुंबई (Mumbai) शहरामध्ये ड्रोन (Drones) आणि अन्य फ्लाईंग ऑपरेशन्स साठी 15 जून पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलेल्या परिपत्रकामध्ये दिली आहे. मुंबई मधील जी 20 समिटच्या (G20 Meetings) पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून वीआयपी लोकांना ड्रोन किंवा रिमोट कंट्रोल ने नियंत्रित एअरक्राफट किंवा पॅराग्लायडर्स द्वारा लक्ष्य केले जाऊ शकतं. अशी भीती पोलिसांनी बोलून दाखवली आहे. मुंबई मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये मुंबई पोलिसांनी ड्रोन सह अन्य फ्लाईंग ऑपरेशन्स वर बंदी टाकण्यात आली आहे.

मुंबई पोलिस डीसीपी ऑपरेशन्स विशाल ठाकूर यांनी मुंबई मध्ये प्रतिबंधात्मक नियमावली जारी केली आहे. मुंबई साठी अशाप्रकारच्या नियमावली वर्षभर कायमच सुरू असतात. मुंबई पोलिस मात्र त्यामध्ये वेळच्या वेळेस कालमर्यादा वाढवत असतात. यापूर्वी 16 एप्रिल ते 15 मे दरम्यान नियमावली जारी केली होती. त्यामध्येही फ्लाईंग अ‍ॅक्टिव्हिटी वर निर्बंध होते. ड्रोन, हॉट एअर बलून्स यांना मुंबई पोलिसांच्या अधिकारक्षेत्रातील भागातच परवानगी होती. नक्की वाचा: Drone shoot down at Rajouri: राजौरी मध्ये LoC वर सिक्युरिटी फोर्सने हाणून पाडले ड्रोन (Watch Video) .

पोलिसांच्या ऑर्डर्सनुसार, आता फ्लाईंग अ‍ॅक्टिव्हिटीजना पुढील 30 दिवस म्हणजे 17 मे पासून 15 जून पर्यंत निर्बंध लागू असणार आहेत. मुंबई पोलिसांकडून aerial surveillance लागू असणार आहे.

मुंबई पोलिसांनी नियमावली मागे घेतली नाही तर 17 मे च्या रात्री 00.01 पासून लागू असणारे निर्बंध 15 जूनच्या रात्री 24.00 पर्यंत लागू असणार आहेत. ज्यांच्याकडून या नियमांची पायमल्ली केली जाईल त्यांच्यावर आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाईला सामोरं जावं लागणार आहे