Bachchu kadu: आमदार बच्चू कडू यांनी मागितली असमच्या जनतेची माफी, कुत्रे खाण्यावरुन केलेले वक्तव्य भोवले

यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो. असे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu | YouTube

अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu kadu) यांनी विधानसभेत  भटक्या कुत्र्यांच्या (Street Dogs) प्रश्नावर बोलताना "महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममधील (Assam) लोक कुत्र्यांचं मांस खातात. आपण जसा बोकड खातो, तसे तिकडचे लोक श्वानाचं मांस खातात." असं वक्तव्य केलं. यानंतर आसाममधील सामान्य आसामच्या नागरिकांनी या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. तसेच या वक्तव्या विरोधात आसामच्या विधानसभेत देखील गोंधळ पहायला मिळाला. आमदार बच्चू कडू यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली. यानंतर आता बच्चू कडू यांनी माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे.  (KCR On Sheetal Mhatre Video: शीतल म्हात्रे, आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल! केसीआर म्हणाले  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूला काय हे काय चाललंय?)

नागालँडमधील नागरिक कुत्रे कापून खातात आसाम मधील कुत्रे खातात हा माझा गैरसमज झाल, दोन्ही राज्य जवळजवळ असल्याने मी चुकून नागालँडच्या ऐवजी आसामचे नाव घेतले ही माझी चुक झाली. यामुळे त्या राज्यातील लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो. असे बच्चू कडू म्हणाले.

दरम्यान आसाम विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बच्चू कडू यांच्या वक्तव्यावरून मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाले. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. “आसामबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सरकार यावर शांत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आसाममधील विरोधी पक्षातील आमदारांनी हे वक्तव्य करणाऱ्या बच्चू कडूंना अटक करा, अशी मागणी केली होती. यावेळी झालेल्या गोंधळामुळे आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांना त्यांचं भाषणदेखील थांबवावं लागलं होतं.