Maharashtra Lok Sabha Election Results 2019: औरंगाबाद मध्ये चंद्रकांत खैरे विरूद्ध इम्तियाज जलील लढत रंगतदार वळणावर
औरंगाबादमध्ये सध्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे(Chandrakanth Khire) आणि एमआयएम चे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे.
लोकसभा निवडणूक निकाल 2019 ला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. आधी कल आणि त्यानंतर कौल यांचं गणित जुळवता जुळवता अनेक उमेदावारांची धाकधुक वाढली होती. औरंगाबादमध्ये सध्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे(Chandrakanth Khire) आणि एमआयएम चे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. अद्यापही दोन फेर्या होणं बाकी आहे. त्यानंतरच अंतिम निकाल हाती येणार आहे.
सुरूवातीच्या तप्प्यात इम्तियाज जलील आघाडीवर होते त्यामुळे ते विजयी होतील असा अंदाज वर्तवला जात होता मात्र शेवटच्या टप्पात ही लढत अधिक रंगतदार झाल्याने आता नेमकी कोण बाजी मारणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार लढत असलेली मावळची जाग जिंकू असे आम्हाला कधीच वाटले नव्हते: शरद पवार)
महाराष्ट्रात 48 जागांवर शिवसेना भाजपाने युती केली होती. त्यापैकी 23 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. सध्या 18 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे.