Ajit Pawar, Bacchu Kadu Conflict: अजित पवार , बच्चू कडू यांच्यात निधीवाटपावरुन वाद; अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजन बैठकीत नाराजी

ही बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. या वेळी अनेक लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केली. काही जिल्ह्यांना वाढीव निधी मंजूर करण्यात आला. या वेळी राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात एका बैठकीदरम्यान जोरदार वाद झाला.

Ajit Pawar and Bacchu Kadu | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यात एका बैठकीदरम्यान जोरदार वाद झाल्याचे वृत्त आहे. हा वाद निधीवाटपावरुन झाल्याचे समजते. प्राप्त माहितीनुसार अमरावती विभागाची वार्षिक नियोजन बैठक (Annual Planning Meeting of Amravati Division) सुरु होती.या वेळी निधीवाटवादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. मात्र, अकोला जिल्ह्याला थोडा अधिक निधी मिळाल्यानंतर या वादावर पडदा पडल्याचे सांगण्यात आले. तरीही राज्यमंत्री बच्चू कडू यांनी निधीबाबात नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, अमरावती विभागाची वार्षीक नियोजन बैठक आज पार पडली. ही बैठक अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात पार पडली. या वेळी अनेक लोकप्रतिनिधींनी वाढीव निधीची मागणी केली. काही जिल्ह्यांना वाढीव निधी मंजूर करण्यात आला. (हेही वाचा, Nana Patole on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बैठकीत भांडण, भाजपला थेट सोडचिठ्ठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितला किस्सा)

कोणत्या जिल्ह्याला किती निधी?

निधिवाटपाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, मी सरकारमध्ये आहे. त्यामुळे मला फार बोलता येत नाही. परंतू, विदर्भाचा अनुषेश भरुन निघावा यासाठी आम्ही अधिक निधीची मागणी केली होती. निधी वाढवून देण्यात आला आहे. परंतू तेवढा पुरेसा नाही. मिळालेल्या निधीपेक्षा अधिक निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करु, असे म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना केलेल्या तरतुदीपेक्षा अधिक निधी देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्याला 165 कोटी रुपये निधीची तरतूद होती पण त्यात वाढ करुन ती 185 कोटी करण्यात आली. अमरावती जिल्ह्याला 285 कोटींवरुन 300 कोटी, यवतमाळसाठी 310 कोटींवरुन 325, बुलढाणा 285 वरुन 295, वाशिम 140 कोटींवरुन 185 कोटी रुपये इतक्या अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. वाशिम जिल्हा हा आकांक्षित (मागास) जिल्ह्यांपैकी असल्याने या जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकचा वाढीव निधी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, निधीवाटपावरुन कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे अजित पवार म्हणाले.