Nandurbar Accident: नवापूर येथे अनियंत्रित ट्रकचा डिव्हायरला आढळून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

नंदुरबार येथील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

Nandurbar Accident: नवापूर येथे अनियंत्रित ट्रकचा डिव्हायरला आढळून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू
Accident (PC - File Photo)

Nandurbar Accident:  नंदुरबार येथील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ट्रक अनियंत्रित होऊन डिव्हायडरला धडकल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ट्रक साखरने भरलेला होता. घाटात तीव्र उतार असल्याने ट्रक रस्त्यावर काही अंतरावपर्यंत फरफटत गेला. दुर्दैवाने या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला. आज सकाळी मिनी बस आणि ट्रकचा अपघात झाला होता ही घटना ताजी असताना दुसरा अपघात घडला. (हेही वाचा- मिनी बस आणि ट्रकची धडक, अपघातात चौघांचा मृत्यू,अमरावतीतील घटना)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी आकरा वाजेच्या सुमारास नवापूर येथील घाटात ट्रकचा अपघात झाला. ट्रक रस्त्यावर काही अंतरापर्यंत फरफटत नेले. ट्रक भरधाव वेगात होती दरम्यान ती अनियंत्रित झाली. अनियंत्रित ट्रक डिव्हायरला आढळली. ट्रक धुळ्यावरून सुरतच्या दिशेने जात होती तेव्हा ही घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य सुरु केले. विसरवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघाता झाला होता.

ट्रक पलटी झाल्याने साखराच्या अनेक गोण्या संपुर्ण रस्त्यावर पडल्या. ट्रक पलटी झाल्याने चालकाला बाहेर येणं शक्य झाले नाही. दरम्यान गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी अडकलेल्या चालकाला बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2024 03:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).