Amravati Farmer Suicide: मार्च-एप्रिल महिन्यात अमरावतीत 66 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 2001 पासूनची आकडेवारी पाहून व्हाल थक्क

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र, एकीकडे बळीराजा आर्थिक संकटात अडकूण मृत्यूला कवटाळत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. अमरावीत गेल्या दोन महिन्यात 66 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

Farmers | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

Amravati Farmer Suicide: लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय नेत्यांचा प्रचारसभांचा धडाका राज्यभरात सुरू आहे. मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी उमेदवार अनेक मोठमोठी आश्वासने देत आहे. काही ठिकाणी पैशांची प्रलोभने दिली जात आहेत. निवडणुकीचा हा रणसंग्राम शिगेला पोहचला असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात अमरावती(Amravati)त तब्बल 66 शेतकऱ्यांनी (Farmer) मृत्युला कवटाळलं आहे. त्यामुळे राज्यातला शेतकरी आर्थिक संकटात असल्याचं वास्तव पुन्हा अधोरेखीत झालं आहे. (हेही वाचा:Farmer Suicide: 'दुष्काळा'त तेरावा महिना! बॅंकेकडून कर्ज फेडण्याची नोटीस येताच शेतकऱ्याने केली आत्महत्या,छत्रपती संभाजी नगर येथील घटना )

धक्कादायक म्हणजे यातील 40 शेतकऱ्यांच्या आत्महत्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. एका आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. कधी दुष्काळ (Drought ) कधी अतिवृष्टीने (Heavy Rain) बळीराजा हवालदिल झाला आहे. झालेलं नुकसान आणि अंगावरचा कर्जाचा बोजा त्याला सहन होत नाहीये. त्यामुळे अखेर 66 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा पर्याय निवडला. आपलं जीवन संपवलं. त्यामुळे आतातरी सरकार त्याचे डोळे उघडेल का? आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देईल का? अशी मागणी अमरावतीत अनेकजण करत आहेत.

शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. मात्र, तो आर्थिक अडचणीत असताना राजकारण्यांकडून मात्र त्याला दुर्लक्षित केलं जात आहे. एकीकडे राजकारण्यांकडून प्रचारासाठी पैशांची उधळपट्टी केली जात आहे. दुसरीकडे राज्यात असाही शेतकरी आहे. ज्याच्याकडे गरजेच सामान घ्यायला पैसे नसतील.

आकडेवारीनुसार, गेल्या 4 महिन्यांत जिल्ह्यात एकूण 188 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, नापिकी, सावकारांसह बँकांचे कर्ज, कर्ज वसुलीचा तगादा, मुलामुलींचे लग्न, यासह अन्य त्यांच्या आत्महत्येला कारण आहेत. 2001 पासून 2024 पर्यंत विभागातील 5 हचार 294 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now