आदित्य ठाकरे ‘जन आशीर्वाद यात्रा’ काढून महाराष्ट्र भर साधणार सामान्यांशी संपर्क, 12 जुलै पासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात

काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Aaditya Thackeray (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊ ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सार्‍याच पक्षांची चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना देखील 12 जुलै, शुक्रवार पासून जन आशिर्वाद यात्रा सुरू करणार आहे. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) या जन आशिर्वाद यात्रेद्वारा महाराष्ट्रभर फिरणार आहेत. या यात्रेद्वारा सामान्यांशी संपर्क वाढवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे.

शिवसेनेप्रमाणेच काही दिवसांपूर्वी भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली 'फिर एक बार शिवशाही सरकार' म्हणत महाराष्ट्रभर फिरणार असल्याचं सांगितलं होतं. यापूर्वी शिवसेनेने लोकसभा निवडणूकीदरम्यान 'आदित्य संवाद' हा अनोखा उपक्रम हाती घेतला होता.

'ज्यांनी मत दिलंय त्यांचे आभार, ज्यांनी नाही दिलंय त्यांची मनं जिंकायची' या मथळ्याखाली आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद' यात्रेचं आयोजन केलं आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूकीच्या रिंगणात आदित्य ठाकरे उतरणार असल्याची चर्चा रंगली आहे.