महाराष्ट्र अपर पोलिस महासंचालक देवेन भारती यांनी ATS चीफ म्हणून पदभार स्वीकारला
राज्य सरकारने अतिरिक्त पोलिस महासंचालक देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालक (Additional Director General of Police) देवेन भारती (Deven Bharati) यांची राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (Anti-Terrorism Squad) प्रमुख म्हणून नियुक्ती केल्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला आहे. गेल्या महिनाभरापासून देवेन भारती आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त म्हणून कारभार पाहत होते. त्यानंतर त्यांना पदोन्नती देत ATS चीफ म्हणून नियुक्त करण्यात आले.
ANI ट्विट:
गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदाची सुत्रं त्यांच्याजवळ गेली पाच वर्षे होती. तसंच त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सहपोलीस आयुक्तपदावर चार वर्षे काम केले आहे. देवेन भारती यांची एप्रिल 2015 मध्ये मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
लोकसभा निवडणूका जाहीर झाल्यानंतर एकाच पदावर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांचया बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने अपर पोलिस महासंचालक आणि विशेष महानिरीक्षक पदाच्या 19 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.