School: शाळेची फी न भरल्याने पुण्यातील एका शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यापासून रोखले, पालकांनी केली कारवाईची मागणी
काही विद्यार्थी गेटजवळ अनभिज्ञ उभे होते.
पुण्यातील (Pune) मोरवाडी येथील एसएनबीपी हायस्कूलमधील (SNBP High School) इयत्ता नववीच्या काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांनी वेळेवर फी (Fee) न भरल्यामुळे शाळा प्रशासनाने मंगळवारी त्यांच्या अंतिम परीक्षेला बसू दिले नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली असतानाच, शिक्षणमंत्र्यांच्या कार्यालयाने नंतर शाळेवर कारवाई केली जाईल असे सांगितले. सकाळी विद्यार्थी वर्गात प्रवेश करू लागताच दोन कर्मचारी, एक शिक्षक आणि एक समन्वयक यांनी ज्यांची फी अद्ययावत नाही त्यांना शाळेच्या गेटजवळ उभे राहण्यास सांगितले. काही विद्यार्थी गेटजवळ अनभिज्ञ उभे होते. त्यानंतर पालकांपैकी एकाने शाळेत धाव घेतली. आपल्या मुलाचा आणि इतर विद्यार्थ्यांचा अपमानित केल्याबद्दल प्रशासनाला प्रश्न केला.
त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरली नसल्याने त्यांना परवानगी देण्यात आली नाही. याबाबत शाळेचे संचालक डी.के.भोसले म्हणाले, काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार स्मरण करूनही अनेक महिन्यांपासून फी भरली नाही, त्यामुळे आज कारवाई करण्यात आली. मात्र, ज्या पद्धतीने कारवाई झाली, तशी कारवाई व्हायला नको होती. शाळेचे मुख्याध्यापक रजेवर आहेत. बुधवारी आम्ही पालकांसोबत हे प्रकरण मिटवू असे भोसले म्हणाले. हेही वाचा Pune: एक व्यक्ती दारुच्या नशेत लावायच्या पोलिसांना फोन, पत्त्याचा शोध घेत पुणे पोलिसांकडून अटक
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयातील अधिकारी म्हणाले, कोणत्याही शाळेला मुलांशी अशा अपमानास्पद वागणूक देण्याचा अधिकार नाही. आम्ही पुण्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना एसएनबीपी शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश देऊ. पुण्याचे शिक्षण उपसंचालक एस वखारे म्हणाले, आम्हाला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्री कार्यालयाने कळवले आहे. याप्रकरणी आम्ही कारवाई करू. या कोविड कालावधीत फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, असे सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत.
इंडिपेंडंट इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनचे प्रमुख राजेंद्र सिंह म्हणाले, हे दुर्दैवी आहे. शाळेतील कर्मचार्यांनी विद्यार्थी आणि पालकांशी असे वागू नये. मी ही समस्या SNBP प्रशासनाकडे मांडली आहे. त्यांना पालकांसोबत सौहार्दपूर्णपणे समस्या सोडवण्यास सांगितले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे पालक काही कारणास्तव फी भरण्यास सक्षम नसतील तर त्यांचा अपमान होऊ नये.