Mumbai: सोसायटीतील महिलेचा अपमान केल्याबद्दल मुंबईतील निवृत्त पोलिस आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल

एअर होस्टेसचा अपमानास्पद वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर मांटुगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली.

FIR

Mumbai: मुंबईत एका निवृत्त सहायक पोलिस आयुक्त मधुकर संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. एअर होस्टेसचा अपमानास्पद वक्तव्य केले त्यामुळे त्यांच्यावर मांटुगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली. दोघांमध्ये जोरजोरात वाद झाला होता ज्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. (हेही वाचा- वाशी टोल नाक्यावर मनसेचा राडा; कामगारांच्या पगारात कपात केल्याने अधिकाऱ्यांच्या लगावली कानशिलात)

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दादर येथील रहिवासी आहे. तीनं मांटुगा पोलिसांकडे या घटनेची तक्रा नोंदवली. तक्रारदार महिला मांटुगा येथील इमारतीत राहत आहे. जेथे मधुकर संखे हे इमारतीचे सचिव म्हणून काम करतात. महिनाभरापासून या इमारतीला कलरिंगचे काम सुरू असून, यादरम्यान तक्रारदाराने संखे यांना पार्किंगच्या ठिकाणी अडथळा ठरणारा फलक काढण्याची वारंवार विनंती केली. तिच्या तक्रारी असूनही, या समस्येकडे त्यांनी सातत्याने दुर्लक्ष केले.

६ ऑगस्ट रोजी तक्रारदार आपल्या  ५ वर्षाच्या मुलासोबत इमारतीच्या परिसरात होती. त्यावेळी सचिव यांना तो फलक काढण्यात विनंती केली. परंतु त्यावेळीस संखे यांनी महिलेला शिवीगाळ केली. त्यांच्या शाब्दिक बाचाबाची झाली. संखे यांनी महिलेचा अपमान केला. त्यानंतर रागाच्या भरातत महिलेने पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार केली. पोलिसांनी अधिकृतपणे भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ७९ ( महिलेचा अपमान केल्याची कृती) अंतर्गत संखे विरुध्दात एफआयआर नोंदवला.