Pune Bridge Collapse Update: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू, 55 जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य पूर्ण
एकूण 55 जणांना वाचवण्यात आले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
Pune Bridge Collapse Update: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील (Indrayani River) पूल कोसळण्याच्या (Bridge Collapse) घटनेत, सर्व बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यात आला असून बचाव कार्य पूर्ण झाले आहे. याबाबत एनडीआरएफ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. एकूण 55 जणांना वाचवण्यात आले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन जणांची ओळख पटली असून एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही. इंद्रायणी नदीवरील पूल अरुंद पादचारी पुलावर 150-200 हून अधिक लोक होते. पूलाचा एक भाग खाली कोसळला. यावेळी अनेकजण पाण्यात बुडाले.
प्रत्यक्षदर्शी स्वप्नील कोल्लम यांनी सांगितले की, अपघातावेळी पुलावर 150-200 हून अधिक लोक होते पण ज्या ठिकाणी पूल कोसळला तिथे 50 हून अधिक लोक होते. देवाची कृपा आहे की माझे कुटुंब सुरक्षित आहे. तथापी, आणखी एक प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आपण सुरक्षित आहोत ही भगवान रामाची कृपा आहे. आज माझा आणि माझ्या कुटुंबाचा पुनर्जन्म आहे. (हेही वाचा - Pune Bridge Collapse: इंद्रायणी नदीवरील पर्यटक पूल कोसळल्याने 3 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती व्यक्त केला शोक)
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू -
रोहित पवार यांची प्रतिक्रिया -
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी अपघात दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रात असे अनेक पूल आहेत जे 100 वर्षे जुने आहेत आणि त्यांची अवस्थाही जीर्ण झाली आहे. ही घटना घडली तेव्हा स्थानिक तरुणांनी सुमारे 20-25 लोकांना वाचवले. एनडीआरएफ आणि पोलिसांनीही लोकांना वाचवले. पूल खूप जुना होता आणि त्याच्या नूतनीकरणाची चर्चा होती, परंतु दुर्दैवाने त्याचे नूतनीकरण होऊ शकले नाही. महाराष्ट्रात असे अनेक पूल आहेत जे जुने असून ते जीर्ण झाले आहेत.