Mumbai Airport Gold Seized: अंतर्वस्त्रात लपवून आणलेले 32 किलो सोनं मुंबई विमानतळावर पकडलं; दोन परदेशी महिलांना अटक
यात परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.
कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. यात परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. बॅग आणि अंतर्वस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे तब्बल 32.69 किलो सोनं मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) कस्टम विभागाने पकडले आहे. या प्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 19 कोटी 15 लाख इतकी असल्याची माहिती कस्टम विभागाच्या (Customs Department) अधिकाऱ्यांनी दिली आहे. (हेही वाचा - Mumbai Nhava Sheva Port: न्हावा शेवा बंदरात मोठ्या प्रमाणात तस्करी केलेले इलेक्ट्रॉनिक्स जप्त; SIIB ची मोठी कारवाई)
पाहा पोस्ट -
दरम्यान या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणा मुंबई विमानतळावर अधिक सतर्क झाले आहे. परदेशातून आलेल्या दोन संशयित महिलांना कस्टम विभागाने ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता, त्यांनी छुप्या पद्धतीने बॅग आणि अंतवस्त्रात लपवून आणलेले तस्करीचे तब्बल 32.69 किलो सोनं मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने पकडलंय. या प्रकरणी दोन्ही विदेशी महिलांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सध्या केली जात आहे.
झटपट पैसे कमावण्याच्या नादात अनेक जण गैरप्रकारांचा मार्ग अवलंबत. बहुदा काहीवेळ त्यांना यशही येतं. मात्र पोलिसांच्या नजरेतून क्वचितच हे गुन्हेगार सुटत असतात. अशाच एका कारवाईचा पर्दाफाश मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केला आहे.