Matheran Tragedy: माथेरानमधील चार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील दहा विद्यार्थी माथेरानला सहलीसाठी आले होते. या दरम्यान, तीन विद्यार्थी चार्लोट तलावात बुडाले.

Matheran Tragedy: माथेरानमधील चार्लोट तलावात नवी मुंबईतील 3 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
College students drown in Charlotte Lake (फोटो सौजन्य - X/@ThorveMahendra)

Matheran Tragedy: मुंबईजवळील लोकप्रिय हिल स्टेशन असलेल्या माथेरान (Matheran) मधील शार्लोट तलावात (Charlotte Lake) रविवारी तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील दहा विद्यार्थी माथेरानला सहलीसाठी आले होते. या दरम्यान, तीन विद्यार्थी चार्लोट तलावात बुडाले.

बुडणाऱ्या मित्राला वाचवायला गेलेल्या दोघांचा मृत्यू -

या विद्यार्थ्यांनी आधी पिशरनाथ मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते शार्लोट तलावाकडे गेले. पाण्याजवळ वेळ घालवत असताना, एक विद्यार्थी चुकून घसरून तलावात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, त्याच्या दोन मित्रांनी पाण्यात उडी मारली. परंतु तेही पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले आणि बुडाले. त्यानंतर बाकी विद्यार्थ्यांनी आणि स्थानिकांनी बचाव अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. (हेही वाचा - Pune Bridge Collapse Update: पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू, 55 जणांना वाचवण्यात यश; बचाव कार्य पूर्ण)

माथेरानमध्ये तलावात बुडून 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू -

माथेरान पोलिसांनी तातडीने कारवाई करत सह्याद्री आपत्कालीन बचाव पथकाला बोलावले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू असल्याचे वृत्त आहे. प्रयत्न करूनही, तिन्ही तरुणांचे प्राण वाचवता आले नाहीत. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सुमित चव्हाण (16), आर्यन खोब्रागडे (19) आणि फिरोज शेख (19) अशी मृतांची ओळख पटली आहे.

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू -

दरम्यान, रविवारी पुणे जिल्ह्यात तळेगावजवळ इंद्रायणी नदीवरील एक अरुंद, जुना पूल कोसळला. या दुर्घटनेत चार जणांना आपला जीव गमवावा लागला असून 51 जण जखमी झाले. मृतांची नावे चंद्रकांत साळवे, रोहित माने आणि विहान माने अशी आहेत, तर एकाची ओळख पटलेली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2025 12:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).