Girls Drowned in Khadwasla Water: खडकवासला धरणावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 2 मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू; 7 जणींना वाचवण्यात यश
खुशी संजय खुर्दे आणि शितल भगवान तितोरे अशी मृत मुलींची नावे आहेत.
Girls Drowned in Khadwasla Water: पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या (Khadakwasla Dam) पाण्यात कपडे धुड्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. या दोन मुलींचे मृतदेह पुणे महानगर विकास सहकार्य प्राधिकरणाच्या (Pune Metropolitan Development Cooperation Authority PMRDA) अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी बाहेर काढले आहेत. खडकवासला धरणावर नऊ मुली आणि महिलांचा गट कपडे धुण्यासाठी गेला होता.
प्राप्त माहितीनुसार, कपडे धुण्यासाठी गेलेली एक मुलगी पाण्यात केली आणि बुडू लागली, त्यानंतर इतर मुली आणि महिला तिच्या मदतीला धावल्या. पण त्याही पाण्यात बुडाल्या. सुदैवाने आजूबाजूच्या स्थानिकांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्यातील 7 जणींना वाचवण्यात यश आले. मात्र, दोन मुलींचा शोध लागला नसल्याने शोधमोहीम राबवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. (हेही वाचा -Thane Building Slab Collapse: सातमजली इमारतीचा स्लॅब कोसळून तिघे जखमी, ठाणे येथील घटना)
व्यापक शोध घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने बेपत्ता झालेल्या दोन मुलींचे मृतदेह बाहेर काढले. खुशी संजय खुर्दे आणि शितल भगवान तितोरे अशी मृत मुलींची नावे आहेत. स्थानिकांनी वाचवलेल्या सात मुलींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी कुमुदिनी खुर्दे (वय,10) या मुलीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, रविवारी गडचिरोलीत चार तरुणांचा बॅरेजजवळ बुडून मृत्यू झाला. चार तरुण गडचिरोली जिल्ह्यातील चिचडोह बॅरेजच्या दरवाज्याखाली खोलगट भागात पोहण्यासाठी गेले होते. हे चार तरुण खोलगट भागात गेल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.