मुंबई: 2 अल्पवयीन मुलींचे फोटो पॉर्न साईट वर टाकून ब्लॅकमेलिंग; आरोपी गुजरातमधून अटकेत

पॉर्न साईटवर मुंबईतील दोन अल्पवयीन मुलींचे फोटो वापरुन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई: 2 अल्पवयीन मुलींचे फोटो पॉर्न साईट वर टाकून ब्लॅकमेलिंग; आरोपी गुजरातमधून अटकेत
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

पॉर्न साईटवर (Porn Site) मुंबईतील दोन अल्पवयीन मुलींचे फोटो वापरुन त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. जानम पोरवाल असे या आरोपीचे नाव असून त्याने दोन मुलींचा चेहऱ्यापर्यंतचा भाग मॉर्प करुन तो पॉर्न फोटोंवर लावला. इतकंच नाही तर त्याने हे फोटोज दोन्ही मुलींना इंस्टग्रामवर पाठवले आणि त्यांचे ब्लॅकमेलिंग सुरु केले. पोरवाल हा सधन कुटुंबातील मुलगा असून तो गेल्या तीन महिन्यांपासून हा गुन्हा करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीला गुजरातमधील अहमदाबाद येथून अटक करण्यात आली आहे. पीडित दोन्ही मुली अल्पवयीन आहेत. जानम या फोटोच्या आधारे दोन्ही मुलींना ब्लॅकमेल करत होता. इतकंच नाही तर मुलींना व्हिडिओ चॅट करण्यास त्याने भरीस पाडले आणि विवस्त्र होण्याची मागणी करत त्यांचे रेकॉर्डींग केले. त्यानंतर या रेकॉर्डींगच्या आधारे तो दोन्ही मुलींना त्रास देऊ लागला.

जानमकडून होणाऱ्या त्रासाची माहिती पीडित मुलींपैकी एकीने तिच्या आई-वडीलांना दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र पोलिसांना आरोपीपर्यंत पोहचण्यास महिन्याभराचा कालावधी लागला.

जानम पोरवाल हा पीडित मुलींना स्पूफ कॉलवरुन फोन करायचा. त्यामुळे मुलींच्या फोनवर परदेशी नंबर दिसायचा. फोनवर बोलताना त्याचा चेहरा झाकलेला असायचा. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी महिना लागला.

(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2019 05:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).