Unnatural Sex Case: धक्कादायक! 19 वर्षीय कैद्याने ठेवले 20 वर्षीय कैद्यासोबत अनैसर्गिक शारिरीक संबंध, आर्थर रोड तुरुंगातील घटना

ज्यात एका 19 वर्षीय कैद्याने (Prisoner) 20 वर्षीय कैद्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी (NM Joshi Marg Police) अनैसर्गिक गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

| (Photo Credit: Archived, edited, representative images)

आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Prison) अनैसर्गिक सेक्स (Unnatural sex) केल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एका 19 वर्षीय कैद्याने (Prisoner) 20 वर्षीय कैद्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी एनएम जोशी मार्ग पोलिसांनी (NM Joshi Marg Police) अनैसर्गिक गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. मोहम्मद इर्शाद इस्लाम शेख असे आरोपीचे नाव असून तो गोवंडीतील (Govandi) गौतम नगर येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे आर्थर रोड कारागृहाच्या सर्कल क्रमांक 1 मधील बॅरेक क्रमांक 7 मध्ये ही घटना घडली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांकडून एक तक्रार प्राप्त झाली असून, कारागृहात लैंगिक शोषणाच्या कथित घटनेची चौकशी करण्यास पोलिसांना सांगितले आहे.

त्यानंतर एनएम जोशी मार्ग पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांनी कारागृहाला भेट दिली आणि ओशिवरा येथील रहिवासी असलेल्या पीडितेचे जबाब नोंदवले. पोलिसांनी सांगितले की, पीडितेकडे चौकशी केली असता असे दिसून आले की, पहाटे 2 ते पहाटे 2:30 च्या दरम्यान, बॅरेक क्रमांक 7 मध्ये असलेल्या शेखने पीडितेवर अत्याचार केला आणि पीडितेला ओरल सेक्ससाठी भाग पाडले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली. मात्र, पीडितेने तुरुंग अधिकाऱ्यांना आपल्या त्रासाची माहिती दिली.  पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 377 (अनैसर्गिक अपराध), 323 (स्वैच्छिक दुखापत करण्यासाठी शिक्षा) आणि 506 (गुन्हेगारी धमकीची शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा Aurangabad Crime: बायकोला साडी नेसता येत नाही, 'I Quit' स्टेटस ठेवून पतीची आत्महत्या

दोन्ही कैदी न्यायालयीन कोठडीत असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. आरोपीने इतर कैद्यांसोबत असेच गुन्हेगारी कृत्य केले आहे का किंवा करण्याचा प्रयत्न केला आहे का याचाही आम्ही तपास करत आहोत. आम्ही आत्ताच गुन्हा नोंदवला आहे आणि लवकरच संशयिताला अटक करू. एक पोलीस अधिकारी म्हणाला.