पॉर्न बघण्याचे व्यसन लागले तर होऊ शकतात अनेक त्रास; जाणून घ्या या बद्दल अधिक माहिती
परंतु, पॉर्न पाहण्याची सवय लागण्यापूर्वीच तुम्ही ते थांबवायला हवं. कारण याची जर तुम्हाला सवय लागलीच तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात.
अनेकांना पॉर्न किंवा ब्लू फिल्म पाहाव्याशा वाटतात. परंतु, पॉर्न पाहण्याची सवय लागण्यापूर्वीच तुम्ही ते थांबवायला हवं. कारण याची जर तुम्हाला सवय लागलीच तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. या व्यसनामुळे अनेक त्रास देखील होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला त्याचे मानसिकताच नाही तर शारीरिक त्रास देखील होऊ शकतात. तर या बद्दल आम्ही आज थोडक्यात तुम्हाला सांगणार आहोत.
अति पॉर्न बघण्याचे व्यसन जर कोणाला लागले तर मग त्यांना त्यांच्या आजूबाजूला कोणीच नको असते. त्या व्यक्तीला फक्त आपला लॅपटॉप किंवा फोन अधिक प्रिय वाटू लागतो. अशाने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याच गोष्टीत त्यांना रस वाटत नाही. याचे पडसाद म्हणजे अशी माणसं ग्रुपमधून तुटू लागतात. अशी व्यक्ती हळू हळू एकलकोंडी होत जाते आणि माणसांसोबत राहणंच विसरून जाते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्यावेळी अनेक जण पॉर्न पाहतात. पण या सवयीच्या आहारी गेलेल्या लोकांना वेळेचं भान उरात नाही आणि याचा परिणाम म्हणजे, झोपेची आणि विश्रांती घेण्याची वेळ कमी होते. मग हळू हळू निद्रानाशाचा त्रास झालेला पाहायला मिळतो.
पॉर्न अवेळी पाहिल्यामुळे निद्रानाश तर होतोच, पण पॉर्न व्हिडिओ पाहताना काही जण त्यांच्या गुप्तांगाला हात लावून समाधान मिळण्याचा प्रयत्न करत असतात. या कृत्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोष्टींची अनेकांना नीट माहिती नसल्यामुळे त्यांना गुप्तांगाच्या ठिकाणी जखमा देखील होऊ शकतात.
सर्वात मोठे नुकसान म्हणजे पॉर्न पाहण्याची सवय माणसाला इतकी एकलकोंडी करते की, त्या व्यक्तीला कोणीही काहीही बोललेले सहन होत नाही. माणूस अधिक चिडचिड करू लागतो.