Sex Tips For Men: हनीमूननंतरही सेक्सचा अनुभव टिकून राहण्यासाठी आपल्या महिला पार्टनरसोबत बेडवर करा 'या' Super Exciting गोष्टी

अशा वेळी सेक्सचा हा अनुभव ती भावना एकमेकांच्या मनात कायम ठेवण्यासाठी पुरुषांनी विशेषत: काही ठराविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या महिला जोडीदाराला हनीमूननंतरही आपल्यासोबत सेक्सची इच्छा कायम राहावी यासाठी पुरुषांनी पुढे दिलेल्या काही सुपर एक्सायटिंग गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.

Sex Tips For Men: हनीमूननंतरही सेक्सचा अनुभव टिकून राहण्यासाठी आपल्या महिला पार्टनरसोबत बेडवर करा 'या' Super Exciting गोष्टी
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

लव्ह मॅरेज (Love Marriage) असो वा अरेंज मॅरेज (Arrange marriage) प्रत्येक जोडप्यासाठी त्यांचा 'हनीमून' (Honeymoon) हा खूप खास आणि तितकाच उत्साहवर्धक असतो. ती मधुचंद्राची रात्र ही प्रत्येक जोडप्यासाठी त्याच्या नात्यामधील महत्वाचा दुवा ठरते असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी प्रत्येक जोडप्यांची कपड्यांपासून ते बेडवर आपण काय काय गोष्टी करणार याची तयारी सुरु असते. मात्र अनेकदा असं पाहायला मिळतं की, हनीमूननंतर अनेक जोडप्यांमध्ये सेक्सचा उत्साह काहीसा कमी होती. कदाचित आपल्या जोडीदार कसा आहे वा त्याला सेक्स (Sex) दरम्यान आपल्याकडून काय हवे आहे याची अनेकांना माहिती हनीमूनला ब-यापैकी मिळालेली नसते. मात्र हा उत्साह जर कमी झाला तर तुमच्या नात्यात दुरावा येण्यास वेळ लागत नाही.

अशा वेळी सेक्सचा हा अनुभव ती भावना एकमेकांच्या मनात कायम ठेवण्यासाठी पुरुषांनी विशेषत: काही ठराविक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या महिला जोडीदाराला हनीमूननंतरही आपल्यासोबत सेक्सची इच्छा कायम राहावी यासाठी पुरुषांनी पुढे दिलेल्या काही सुपर एक्सायटिंग गोष्टी ट्राय करायला हरकत नाही.

1. तोंडाचा वापर करा

याचा वेगळा अर्थ न काढता तोंडाचा वापर करा म्हणजे आपल्या महिला जोडीदाराशी बोला. त्यांना सेक्स दरम्यान आपल्याकडून काय गोष्टी हव्या आहेत तसेच तुम्हाला त्यांच्याकडून काय गोष्टी हव्या आहेत ते सांगा. त्याव्यतिरिक्त तिला जवळ करुन प्रेमाने दिलेले चुंबनही सेक्सला सुरुवात करण्यासाठी फार महत्त्वाचा ठरु शकतो.

2. फोरप्ले

फोरप्ले दरम्यान काही रोमँटिक गोष्टी ट्राय करा. त्यात लव बाइट देण्यापासून तुमचा रोमँटिक स्पर्श देखील महिला जोडीदाराला उत्तेजित करु शकतात. Sex Tips: महिलांंनो सेक्स करताना Orgasm मिळवण्यात या 7 गोष्टी ठरु शकतात अडथळा, कसा कराल उपाय?

3. सेक्स गेम्स (Sex Games)

आपल्या महिला जोडीदारासोबत Truth & Dare हा गेम सेक्स गेम्समध्ये बदलून महिला जोडीदारास काही सेक्सी गोष्टी करण्यास सांगा. आपल्या जोडीदाराविषयी चांगल्या गोष्टी बोला.

4. सेक्सी पेहराव

सेक्सचा चांगला अनुभव देण्यासाठी तुम्ही स्वत: शर्टलेस राहा. ज्यामुळे महिला पार्टनर उत्तेजित होतील. अंगावर केस असतील तर ते वॅक्स करण्यास विसरु नका.

5. सेक्स टॉय, चॉकलेट सॉस सारख्या गोष्टींचा वापर करा.

सेक्सचा अनुभव Orgasm पर्यंत पोहोचविण्यासाठी काही हटके गोष्टी ट्राय करायच्या असतील सेक्स टॉयचा वापर करा. चॉकलेट सॉस, वाईन, बर्फ यांसारख्या गोष्टी सेक्सदरम्यान वापरा.

हनीमूननंतर सेक्सचा अनुभव टिकून राहण्यासाठी आपल्या महिला जोडीदाराला खूश ठेवणे गरजेचे आहे. यासाठी वर दिलेल्या सुपर एक्सायटिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच कामी येऊ शकतात.

(The above story first appeared on LatestLY on Sep 12, 2020 09:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).