चाणक्य नीती महिलांसाठी: या 5 गोष्टी गुप्त ठेवण्याचा सल्ला, जाणून घ्या कारण
आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती या ग्रंथात जीवनातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले आहे. यामध्ये महिलांनी कोणत्या पाच गोष्टी गुप्त ठेवाव्यात, याबाबतही काही उल्लेख आढळतो. जाणून घ्या सविस्तर.
आचार्य चाणक्य यांनी शतकांपूर्वी रचलेली चाणक्य नीती आजही जीवनातील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शक मानली जाते. राजनीती, अर्थशास्त्र, नातेसंबंध आणि व्यक्तिगत आयुष्य अशा विविध पैलूंवर भाष्य केलेल्या या ग्रंथात काही मोलाचे सल्ले आहेत. यातील काही श्लोक विशेषतः महिलांसाठी सल्ला देणारे आहेत. यानुसार काही गोष्टी गुप्त ठेवणे हे आयुष्य सुरळीत आणि सन्मानपूर्वक जगण्यासाठी आवश्यक मानले जाते. मग पहा चाणाक्य नीती मधून महिलांसाठी काय विशेष सल्ले आहेत ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो.
चाणक्य नीती नेमकी काय ?
चाणक्य नीती हा आचार्य चाणक्य यांनी रचलेला नीतिशास्त्रावरील ग्रंथ आहे. यात जीवनातील विविध पैलूंवर, नात्यांवर आणि वर्तनावर मार्गदर्शक सूत्रे दिली आहेत. स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही यात उपयुक्त सल्ले नमूद करण्यात आले आहेत. यातील काही श्लोक महिलांना काही गोष्टी गोपनीय ठेवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून त्यांचा कोणी गैरफायदा घेऊ नये आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा अबाधित राहावी.
चाणक्य नीतीनुसार महिलांनी कोणत्या 5 गोष्टी लपवाव्यात?
आर्थिक स्थितीबाबत गुप्तता
चाणक्य नीतीनुसार, आपली आर्थिक परिस्थिती किंवा घरातील पैशांशी संबंधित माहिती सर्वांसमोर उघड करू नये असा सल्ला दिला जातो. यामुळे काही लोक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात, असे या ग्रंथात नमूद आहे.
वैयक्तिक व कौटुंबिक समस्यांंची चर्चा
घरातील वाद, नात्यांमधील तणाव किंवा वैयक्तिक अडचणी प्रत्येकासोबत बोलू नयेत, असेही चाणक्य नीतीत सांगितले आहे. अशा गोष्टी उघड झाल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते आणि कौटुंबिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो, असे मत या ग्रंथात मांडले आहे. नक्की वाचा: 'चाणक्य नीती' खरा आणि खोटा मित्र ओळखण्याचे देते हे पाच महत्त्वाचे संकेत.
अपमान किंवा असुरक्षिततेच्या घटना उघड न करणे
आयुष्यात झालेला अपमान किंवा एखाद्या असुरक्षित प्रसंगाची माहिती प्रत्येकासोबत वाटू नये, असा सल्लाही चाणक्य नीतीत दिला जातो. यामुळे मानसिक त्रास वाढू शकतो आणि समोरची व्यक्ती त्याचा चुकीचा वापर करू शकते, असे नमूद आहे.
नात्यांतील खासगी बाबी गोपनीय ठेवणे
पती-पत्नीमधील खासगी संवाद किंवा नात्यातील नाजूक विषय इतरांसमोर मांडू नयेत, असेही या ग्रंथात सांगितले आहे. यामुळे नात्यातील विश्वास कायम राहतो आणि गैरसमज टाळता येतात, असे मानले जाते.
भविष्यातील योजना उघड न करणे
आपल्या भविष्यातील योजना किंवा उद्दिष्टे सर्वांना आधीच सांगू नयेत, असाही एक सल्ला चाणक्य नीतीत आढळतो. यामुळे योजना यशस्वी होण्याआधीच अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते, असे या ग्रंथात नमूद आहे.
चाणक्य नीती हा सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे. त्यामुळे यातील काही सल्ले त्या काळातील सामाजिक परिस्थितीशी निगडित आहेत. आजच्या काळात प्रत्येक सल्ला जसाच्या तसा लागू होईलच असे नाही. मात्र गोपनीयता, विश्वास आणि सावधगिरी यासंदर्भातील मूळ तत्त्वे आजही अनेकांना उपयुक्त वाटतात, असे अभ्यासकांचे मत आहे.
(टीप : हा लेख प्राचीन ग्रंथातील मान्यता आणि सामान्य समजुतींवर आधारित आहे. यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 2026 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

