राशीभविष्य 28 सप्टेंबर 2020: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Zodiac (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

28 सप्टेंबर 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रमंडळींमध्ये खोडकरपणा कराल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर करावा. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करावा.

शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

वृषभ: तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करतांना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा

शुभ दान- अंथरुण दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

मिथुन: प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. स्वत:च्या करमणुकीचा मार्ग शोधावा. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पांढरा

कर्क: मच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करताना घाई करू नका.

शुभ उपाय- हिरव्या रंगाच्या बुटांचा वापर करा

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- हिरवा

सिंह: दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

शुभ उपाय- निळकंठाची पूजा करा

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

कन्या: मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. जोडीदाराच्या वागण्याचे आश्चर्य वाटू शकते. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

तुळ: नोकरदारांचा मान वाढेल. नवीन स्नेहसंबंध जुळून येतील. जवळच्या लोकांची गाठ पडेल. लहान मुलांशी खेळण्यात रमून जाल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

वृश्चिक: चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- जेवण दान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

धनु: तुमच्यातील खळखळता उत्साह जागृत ठेवावा. कामाचा ताण जाणवेल. वेळेचे नियोजन केल्यास बर्‍याच गोष्टी जमून येतील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव राहील. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल.

शुभ उपाय-स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- रक्तदान करा

शुभ अंक-5

शुभ रंग-करडा

मकर: आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: मुलांच्या चंचलतेकडे बारीक लक्ष ठेवावे. रेस, जुगार यांपासून दूर राहावे. आततायीपणे कोणतेही काम करू नये. पित्त विकाराचा त्रास जाणवेल. कामाचा ताण वाढू शकतो.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

मीन: आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी