Fat Burning Leg Workout: वजन कमी करण्यासाठी हे 'तीन' व्यायाम ठरतील फायदेशीर

परंतु काही वेळा आपल्या धावपळीच्या जगात व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही. तर अश्या वेळीस भरपूर वेळ न देता घरच्या घरी पायांचे व्यायाम करा.

leg exercise at home PC PIXABAY

Fat Burning Leg Workout: व्यायाम करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु काही वेळा आपल्या धावपळीच्या जगात व्यायामासाठी वेळ काढणं जमत नाही. तर अश्या वेळीस भरपूर वेळ न देता घरच्या घरी पायांचे व्यायाम करा. जे तुमचे वजन कमी करण्यासाठी उत्तम फायदेशीर ठरतील. या व्यायामाने तुमचे पाय देखील मजबुत होतील. जर तुमचे वजन जास्त असेल तर व्यायाम करताना काळजी घ्या. शरिर फिट राहण्यासाठी हे व्यायाम प्रत्येकाने करावे. जीममध्ये न जाता घरच्या घरी हे व्यायाम शरिरायष्टी चांगली ठेवण्यासाठी मदत करेल. हेही वाचा- ‘One Chip Challenge’ 14 वर्षीय मुलाच्या जीवावर बेतलं; भयंकर तिखट खाल्ल्याने Cardiopulmonary Arrest ने मृत्यू

स्क्वॅट्स

दररोज स्क्वॅट्स केल्याने पायांचे स्नायू मजबूत होता. सुरुवातीला १५ चे दोन सेट असे स्क्वॅट्स करा आणि आठवड्याभरानंतर १५ चे तीन सेट असे स्क्वॅट्स करा. चांगली शरिरयष्टीसाठी स्क्वॅट्स करा.

स्टेप अप्स

या व्यायामाने तुमचे शरिर बॅलेन्स होण्यास मदत होते. पायाची ताकद वाढण्यासाठी हा व्यायाम उत्तम ठरतो. ताकद आणि संतुलन सुधारण्यासाठी स्टेप-अप हा एक उत्तम व्यायाम आहे. जिन्याजवळ हा व्यायाम करा.

काल्फ रेज

हा व्यायामामुळे काल्फचे स्नायू मजबूत होता. हा व्यायाम करणे अगदी सोपे आहे. फक्त सरळ उभे राहा आणि तुमच्या पायाची टाच उचला आणि तळव्यांना आधार देऊन उभे रहा.