घरात शांती नांदायची असेल तर चप्पल कशा ठेवाव्यात या बाबत आहेत हे '5' समज-गैरसमज

तसे केल्यास घरात शांती नांदते असे वास्तुशास्त्र सांगते. घरात चप्पल कशा ठेवाव्यात याबाबत काय सांगते शास्त्र पाहूयात

Sandals (Photo Credits: PixaBay)

पायात चप्पल असणे हा एक आपला दैनंदिन जीवनाचा जणू एक भागच बनलाय. घरातून बाहेर पडताना चप्पल घालून बाहेर पाडणे हा जणू आपला नियमच बनला आहे. मात्र रोज आपला भार वाहणा-या या चप्पल विषयी वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. आजची पिढी अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. मात्र अजूनही आपल्याकडे दाराबाहेर चप्पल ठेवली, अथवा चप्पल उलटी ठेवली तर वडिलधारी माणसे तसे करण्यापासून रोखतात. आणि असं करु नये म्हणून सांगतात. या मागची कारणे अजून आपल्याला नीटशी समजली नाहीत. मात्र घरात चप्पल ठेवण्याविषयी अजून बरेच समज-गैरसमज आहेत.

यावर काही लोक विश्वास ठेवतातही मात्र काही लोक अशा गोष्टी नाकारतात. मात्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात घरात चप्पल कशी ठेवावी या विषयी काही नियम सांगितले आहे. तसे केल्यास घरात शांती नांदते असे वास्तुशास्त्र सांगते. घरात चप्पल कशा ठेवाव्यात याबाबत काय सांगते शास्त्र पाहूयात

1. घरात चप्पल उलटी न ठेवणे

असे म्हणतात की, चप्पल उलटी ठेवल्यास त्या घरात वाद निर्माण होतात. किंवा जर तुम्ही ब-याचदा चप्पल उलटी ठेवत असाल, तर तुम्ही आजारी देखील पडू शकता. म्हणून चप्पल उलटी पडत असेल तर सरळ करुन ठेवणे.

2. घरात तुटलेली चप्पल अथवा बूट न ठेवणे

घराता तुटलेली चप्पल किंवा बूट ठेवल्यास घरात अशांती निर्माण होते. त्यामुळे अशा तुटलेल्या चप्पला तुम्ही तात्काळ दुरुस्त करुन घ्या अथवा फेकून द्या.

3. दारात चप्पला न ठेवणे

दारात चप्पला काढून ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच दारात चप्पला पसरल्यास त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. अशा घरात प्रगती होण्यास दारात ठेवलेल्या चप्पला अडथळा निर्माण करतात.

4. भेटवस्तू म्हणून चप्पला देऊ नये

एखाद्याला भेटवस्तू द्यायची असेल तर चुकूनही कोणाला चप्पला भेटवस्तू म्हणून देऊ नका. असे केल्यास समोरच्या व्यक्तीच्या करिअरवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

5. फाटलेल्या चप्पला वापरू नये

जर तुम्ही फाटलेल्या चप्पला वापरात असाल, तर तुम्हाला जे यश मिळत आहे, त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो फाटलेल्या चप्पला वापरणे टाळावे.

पाहायला गेले तर, या गोष्टी अजून आपल्यामधील बरेच लोक विशेषत: वडिलधारी माणसे मानतात. आजच्या पिढीचा यावर विश्वास बसणे अवघड आहे. त्यामुळे केवळ लोक सांगतात म्हणून अशा गोष्टी करण्यापेक्षा आपले व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत अशी दृष्टीने विचार केला तर काही चुकीचे नाही. बाकी या गोष्टी मानाव्या की मानू हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

(सूचना: या लेखात दिली गेलेली माहिती प्रचलित मान्यतांच्या आधारावर सूचनात्मक उद्देश्य ने दिली गेली आहे. याचा वास्तविकता आणि विशिष्ट परिणामांशी काही संबंध नाही. या विषयी प्रत्येक व्यक्ति वेगवेगळे विचार किंवा मत असू शकते. )