Horoscope Today आजचे राशीभविष्य, गुरुवार 1 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, गुरुवार 1 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

Horoscope Today आजचे राशीभविष्य, गुरुवार 1 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope

Horoscope Today 1 June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, गुरुवार 1 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक स्थिती बरीच चांगली राहील, परंतु कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतो. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला आज चांगली संधी प्राप्त होईल. ज्यामुळे भविष्यात तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधार होईल. आज कोणत्याही प्रकारे पैशांची देवाण-घेवाण टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- गरजूला धान्य दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

वृषभ (Taurus Horoscope Today):  वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, दिवसाचा शेवट मनासारखा होणार नाही. आज थोडा तणाव राहू शकतो, ज्यामुळे तुमची कौटुंबिक स्थिती बिघडू शकते. आजचा दिवस थोडा आव्हानात्मक राहील. आज कुठेही गुंतवणूक करू नका आणि नवीन गोष्ट खरेदी करू नका.

शुभ उपाय- वाहत्या नदीमध्ये नाणे सोडा

शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फलदायी ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. आज कुटुंबाची साथ लाभेल. घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- हिरवा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. कामाचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागेल. आज आरोग्य संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जवळच्या लोकांपासून सावध रहा. कोणावरही चटकन विश्वास टाकू नका. आर्थिक व्यवहारासंबंधी बाबी कोणासोबत शेअर करू नका.

शुभ उपाय- वृद्ध ब्राह्मणांसोबत आपले अन्न वाटून घ्या.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- लाल

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस मध्यम राहील. व्यवसायाच्या नव्या संधी चालून येतील, मात्र गुंतवणूक करताना घाई करू नका. आजच्या दिवशी कोणत्याही बाबतीत निष्काळजीपणा करू नका. कौटुंबिक स्थिती थोडी तणावाची राहील. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. आजूबाजूच्या लोकांसोबत बोलताना जिभेवर ताबा ठेवा, नाहीतर दीर्घकालीन संबंध बिघडू शकतात.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- मंदिरात वस्त्रांचे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- आकाशी

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज भाग्य तुमच्या सोबत राहील. आजचा दिवस उर्जेने भरलेला असेल त्यामुळे हातून उत्तम कार्ये घडतील. जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. आज कुटुंबातून एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज विचार करून केलेली गुंतवणूक भविष्यात फायद्याची ठरेल.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- केशरी

तुळ (Libra Horoscope Today): महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. नोकरीमध्ये दिलासादायक गोष्टी घडतील. इच्छित कार्ये पूर्णत्वास जातील. खरेदीसाठी उत्तम दिवस. मुलांशी खटके उडण्याची शक्यता परंतु त्यामुळे भावनिक होऊ नका. जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता, सावध रहा.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- पिवळा

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): वृश्चिक राशीच्या जातकांसाठी दिवस चांगला राहील. नोकरीच्या ठिकाणी आनंदवार्ता मिळू शकते. व्यावसायिक लोकांची स्थिती चांगली राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. कुटुंबाची साथ लाभेल. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस. मात्र आजच्या दिवशी भांडणाचे प्रसंग टाळा. मधुर वाणीमुळे अपेक्षित रिझल्ट्स मिळतील.

शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- पिठाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पांढरा

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीच्या व्यक्तींना आज दुप्पट मेहनत करण्याची गरज आहे. नोकरी-व्यवसायात समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. परिस्थिती थोडी आव्हानात्मक राहील परंतु शांतपणे विचार करून त्याच्यावर मात करता येईल. आज कोणतेही अनावश्यक खर्च टाळा. स्वतःच्या वाहनाने दूरचा प्रवास करू नका. अनोळखी व्यक्तीला विचारपूर्वक मदत करा.

शुभ उपाय- शंकराच्या पिंडीवर बेल-फेल चढवा

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. मात्र नोकरीच्या ठिकाणी टाळाटाळ करू नका. नोकरी अथवा व्यवसायामधील अडकलेले काम पूर्ण होईल. मित्रमंडळींची गाठभेट होईल. घरातील वातावरण आनंदी राहील.

शुभ उपाय- कुलदैवतेचे नामस्मरण करा

शुभ दान- पक्ष्यांना दाणे घाला

शुभ अंक- 2

शुभ रंग- लाल

कुंभ (Aquarius Horoscope Today): कुंभ राशीच्या व्यक्तींनी आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक स्थिती उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. जुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना काहीतरी गोड खा.

शुभ दान- धातू दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- लाल

मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी-व्यवसायात पुढे झेप घेण्यासाठी संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी जोडीदाराची साथ लाभेल. रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद-भांडणे टाळा. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.

शुभ उपाय- सूर्याला जल अर्पण करा.

शुभ दान- धान्याचे दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- लाल

(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2023 06:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).