Horoscope Today आजचे राशीभविष्य, रविवार 4 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, रविवार 4 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Horoscope Today 4th June 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 4 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या रविवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष (Aries Horoscope Today): आजचा दिवस तुम्ही आनंदात व्यतीत करू शकाल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांची साथ लाभेल.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- केशरी
वृषभ (Taurus Horoscope Today): आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. कोणावरही डोळे झाकून विश्वास टाकू नका. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. तब्येतीच्या समस्या उद्भवतील, मात्र आराम केल्यास उत्साहित वाटेल.
शुभ उपाय- देवाला केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- गुलाबी
मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीतील व्यक्तींनी आज शक्यतो प्रवास करणे टाळा. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.
शुभ उपाय- गाईला चारा द्या.
शुभ दान- तांदूळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पांढरा
कर्क (Cancer Horoscope Today): आज परिवारासंबंधित रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता. जुन्या मित्रांची भेट होईल. आर्थिक लाभाची शक्यता. आज शक्यतो घरीच जवळच्या लोकांसोबत वेळ व्यतीत करा. अनेक प्रश्न मार्गी लागतील.
शुभ उपाय- कुलदेवतेची पूजा करा.
शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- करडा
सिंह (Leo Horoscope Today): आज सिंह राशीच्या व्यक्तींनी विचारपूर्वक वागा व योग्य निर्णय घ्या. घरातील ताणतणामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत स्पष्ट संभाषण ठेवा. कोणत्याही बाबतीत गुंतवणूक करू नका.
शुभ उपाय- बाहेर जाताना दही-साखर खा.
शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- लाल
कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीतील व्यक्तींना व्यवसायासाठी अनुकूल दिवस आहे. आर्थिक योजनांमध्ये गुंतवलेले पैसे भविष्यात चांगले फळ देतील. मात्र यासाठी जोडीदाराचा सल्ला फायद्याचा ठरेल. मित्रपरिवारासह आदराने वागा. जिभेवर ताबा ठेवा. घरातील मंडळींची साथ लाभेल.
शुभ उपाय- सकाळी उठून तुळशीची पूजा करा.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 3
शुभ रंग- क्रिम कलर
तुळ (Libra Horoscope Today): तुळ राशीतील व्यक्तींचा आजचा दिवस उत्साहात जाईल. प्रवास घडेल. जुनी अनेक कामे पूर्ण होती. मात्र आज आळस करणे टाळा. संध्याकाळी मनात थोडी चलबिचल होईल. जवळच्या व्यक्तीकडे मन मोकळे करा, अनेक उत्तरे सापडतील.
शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.
शुभ दान- एखाद्या मुक्या प्राण्याला जेवण द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा
वृश्चिक (Scorpio Horoscope Today): या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल, त्यामुळे संयम आणि जिभेवरील ताबा महत्वाचा.
शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- आकाशी
धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीतील व्यक्तींनी ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ देणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. दूरचा प्रवास टाळा. आज भागीदारीत कोणतीही गोष्ट सुरु करणे टाळा. कुटुंबातील सौख्यासाठी आज घरगुती प्रश्नांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.
शुभ दान- गाईंना चारा द्या.
शुभ अंक- 6
शुभ रंग- जांभळा
मकर (Capricorn Horoscope Today): मकर राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल. घरातील वातावरणही उत्साही असेल. जोडीदाराशी आदराने वागा.
शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पोपटी
कुंभ (Aquarius Horoscope Today): कुंभ राशीतील व्यक्तींसाठी आजच्या दिवसाची सुरुवात उत्तम होईल, मात्र संध्याकाळी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आज एखादी मोल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे. तसेच तब्येतही थोडी नाजूक असू शकते. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या.
शुभ उपाय- सकाळी घराबाहेर पडताना देवाची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- निळा
मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. शारीरिक कष्ट होती. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत, परंतु वाद घालणे टाळा. शांतपणे गोष्टींचा स्वीकार करा. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे.
शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.
शुभ दान- मंदिरात 5 नारळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- केशरी
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)