Horoscope Today आजचे राशीभविष्य, रविवार 26 मार्च 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 26 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, रविवार 26 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): आज मेष राशीच्या व्यवसायिकांनी मोठी गुंतवणूक न करणे हे उत्तम. अनावश्यक खर्च करण्याची सवय नियंत्रणात ठेवणे महत्वाचे आहे. लहान-सहान गोष्टींवर चिडणे अथवा भडकणे टाळा. प्रियजनांचा सल्ला माना.

शुभ उपाय- हनुमान चालीसा पठन करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- लाल

वृषभ (Taurus Horoscope Today): आज वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण राहील आणि आपल्या जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे क्षण व्यतीत करू शकाल. आज व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहे. तरुणांना नोकरीच्या संधी चालून येतील. सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्या.

शुभ उपाय- कुलदेवतेचे नामस्मरण करा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पिवळा.

मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीच्या लोकांनी आज आपल्या तब्येतीबाबत सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही अनुचित अथवा बाहेरची गोष्ट खाणे टाळां. खर्च नियंत्रणात ठेवा. कर्ज घेणे टाळा. आजचा दिवस व्यवसायिकांना लाभदायक ठरणार आहे.

शुभ उपाय- गणेशाची आराधना करा.

शुभ दान- मंदिरात इच्छेनुसार दक्षिणा दान करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- पांढरा

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या लोकांनी आज आपल्या आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. कोणावरही अंध विश्वास ठेवल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवणे उत्तम. आजचा दिवस मध्यम असल्याने आज कोणत्याही नवीन कार्याची सुरुवार करणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी कुलदेवतेची पूजा करा.

शुभ दान- गरजूला पैसे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुमचा जोडीदार आणि इतर निकटच्या लोकांसोबत तुमचे नाते उत्तम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. नोकरीच्या ठिकाणी किंवा घरात आनंदाची बातमी प्राप्त होऊ शकते. महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी जवळच्या व्यक्तीचा सल्ला घ्या.

शुभ उपाय- दही-साखर खाऊन घरातून बाहेर पडा.

शुभ दान- गुळ दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा.

कन्या (Virgo Horoscope Today): कन्या राशीसाठी आजचा दिवस मध्यम आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला अपेक्षित अशा निकट नात्याचा आनंद मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत देखील खटके उडण्याची शक्यता आहे. आज तब्येत बिघडण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे कन्या राशीच्या लोकांनी आज दिवसभर स्वतःची शारीरिक व मानसिकदृष्ट्या काळजी घेणे गरजेचे आहे.

शुभ उपाय- आज दिवसभर स्वतःजवळ काळे तीळ बाळगा.

शुभ दान- गरजूला जमेल तेवढी आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- गुलाबी

तुळ (Libra Horoscope Today): आज तुळ राशीच्या नोकरीतील लोकांचे आयुष्य उत्तम दिसून येत आहे, परंतु व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. कोणालाही पैसे देताना किंवा घेताना दक्ष राहा. आज प्रवासाचा योग आहे. कुटुंबातील सदस्यांची साथ लाभल्याने आजचा दिवस उत्तम राहील.

शुभ उपाय- खिशात पांढरा रुमाल ठेवा.

शुभ दान- मंदिरात वस्त्र आणि नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): वृश्चिक राशीतील व्यक्तींनी आज आळसावर नियंत्रण ठेऊन स्वतःला कार्यरत ठेवणे गरजेचे आहे. निरुत्साही वागणे आणि मौजमजेतच वेळ घालवणे यामुळे तुमच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

शुभ उपाय- गणपतीची आराधना करा.

शुभ दान- सकाळी घराबाहेर पडल्यावर गाईला चारा द्या.

शुभ अंक- 5

शुभ रंग- नारंगी

धनु (Sagittarius Horoscope Today): धनु राशीच्या व्यावसायिक व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज धंद्यात किंवा व्यवसायात रखडलेली कामे पूर्ण होतील. जुने तुटलेले बंध आज पुन्हा जुळून येतील. समोरच्या व्यक्तीच्या मनाचा विचार करून थोडेसे त्याच्या कलाने घेणे फायद्याचे ठरू शकते.

शुभ उपाय- काळे तीळ पाण्यात सोडा.

शुभ दान- गरुजाला एखादे भांडे दान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- करडा

मकर (Capricorn Horoscope Today): मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. वैयक्तिक जीवनात तुम्हाला अपेक्षित असे सुख व शांती मिळेल. कामाच्या ठिकाणीही दिवस आनंदात व्यतीत कराल. नवी कामे अथवा प्रकल्प सुरु करण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबात भांडण-तंटे, वाद टाळा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत होऊ शकतो.

शुभ उपाय- अंघोळ झाल्यावर देवासमोर दिवा लावून नामस्मरण करा.

शुभ दान- गरजूला दही-भात द्या.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पोपटी

कुंभ (Aquarius Horoscope Today): घरगुती बाबी नेहमीसारख्याच राहतील. किरकोळ समस्या निर्माण होण्याची शक्यता असली तरी, परिस्थिती नियंत्रणात असेल. आज शक्यतो प्रवास करणे टाळा. अनावश्यक खर्च टाळा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका.

शुभ उपाय- सकाळी लवकर उठून सूर्य देवतेची पूजा करा.

शुभ दान- वस्त्रदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- आकाशी

मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ असून, त्यांनी आज काळजीपूर्वक वर्तन ठेऊन हुशारीने कृती करणे आवश्यक आहे. अनेक महिन्यांपासून असलेल्या मार्गातील समस्या आज दूर होण्याची शक्यता आहे. कोणावरही लगेच विश्वास टाकू नका. आज कोणत्या ना कोणत्या मार्गाने आर्थिक लाभाचे संकेत आहेत.

शुभ उपाय- 108 वेळा गणपतीचे नामस्मरण करा.

शुभ दान- गुळ अथवा फळ दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- जांभळा.