Horoscope Today आजचे राशीभविष्य, सोमवार 02 ऑक्टोबर 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
आजचे राशीभविष्य, सोमवार 2 ऑक्टोबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.
Horoscope Today 2nd October 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, सोमवार 2 ऑक्टोबर 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशीच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.
मेष (Aries Horoscope Today): आजचे ग्रह तुमच्यावर खुश असल्याचे दिसत आहे. आज तुम्ही योग्य दिशेने प्रवास कराल आणि तुम्हाला यशही मिळेल. तुम्ही तुमचे कार्य व्यवस्थितपणे पार पाडालच, त्याचबरोबर तुम्हाला आदर, सन्मान मिळेल आणि तुमची प्रशंसा होईल. मात्र आज आर्थिक उत्पन्न मिळण्यात थोडे अडथळे निर्माण होतील.
शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.
शुभ दान- गरजूला कपडे दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- लाल
वृषभ (Taurus Horoscope Today): आज कौंटुबिक आयुष्य सुखाचे राहील. तुम्ही परदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, त्याबाबत सकारात्मक गोष्ट कानावर येईल. आर्थिक बाबी सुरळीत करण्यासाठी आज थोडे जास्त प्रयत्न गरजेचे आहे. उद्योजक त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवतील. तुम्ही एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरू कराल.
शुभ उपाय- कुलदैवतेची पूजा करा.
शुभ दान- धातूच्या वस्तूचे दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- निळा
मिथुन (Gemini Horoscope Today): आज तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आर्थिक वृद्धीसाठी आजचा दिवस सुयोग्य आहे. नव्या कल्पना पूर्णत्वास येतील. मात्र आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक आणि आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही स्वस्थ नसाल. आज अतिउत्साहीपणे वागण्यापेक्षा दुसऱ्यांचा सल्ला घेणे चांगले.
शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.
शुभ दान- गायीला चारा द्या.
शुभ अंक- 5
शुभ रंग- केशरी
कर्क (Cancer Horoscope Today): आजचा दिवस संमिश्र असेल. आर्थिक बाबी सांभाळून करा. व्यवसायात जोडीदाराचा सल्ला घ्या. जुन्या आजारातून आराम मिळण्याची शक्यता. आजचा दिवस प्रेमाप्राप्तीसाठी अनुकूल आहे. करियरच्या दृष्टीने चांगली संधी चालून येण्याची शक्यता.
शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.
शुभ दान- पक्ष्यांना दाणे घाला.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पिवळा
सिंह (Leo Horoscope Today): आज व्यावसायिकांना थोडे अधिक कष्ट करावे लागतील, पण लक्षात ठेवा, कष्टांचे फळ हे चांगलेच असते. आज संयमी आणि काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. कामात बढती मिळण्याची शक्यता. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. आजारपणाकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.
शुभ दान- मंदिर उभारणीच्या कामाला हातभार लावा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- आकाशी
कन्या (Virgo Horoscope Today): आज व्यवसायात तेजी दिसून येईल. आर्थिक बाजू बळकट असली तरी, आंधळेपणाने गुंतवणूक करणे योग्य राहणार नाही. आज प्रकृतीमध्ये उतार-चढाव दिसून येतील. याचा अर्थ तुम्ही आजारी पडालच असे नाही, मात्र स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. आज मन थाऱ्यावर असणार नाही, त्यामुळे जोडीदारासोबत वाद झालाच तर तो त्वरित मिटवा.
शुभ उपाय- सकाळी घराबाहेर पडण्याआधी गणपतीची पूजा करा.
शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- करडा
तुळ (Libra Horoscope Today): तुळ राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभकारक आहे. आज कौटुंबिक किंवा सामाजिक आयुष्यात थोडे गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आरोग्य उत्तम राहील. घर किंवा कार घेण्याचा विचार करत असल्यास, त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर पडाल. आर्थिक गुंतवणूकीचा विचार कराल.
शुभ उपाय- घरातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्या.
शुभ दान- धान्याचे दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- जांभळा
वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज नोकरीमध्ये बढती किंवा व्यवसायात फायदा होण्याची शक्यता. लोकांकडून सहकार्य मिळेल आणि तुमच्याविषयी असलेल्या आदर आणि सन्मानात वाढ होईल. खर्चात वाढ होईल त्यामुळे त्यामुळे पैसे खर्च करताना हात आखडता घ्या. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस सकारात्मक राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
शुभ उपाय- महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.
शुभ दान- कोणत्याही धातूचे दान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- पिवळा
धनु (Sagittarius Horoscope Today): आज कौटुंबिक सौख्य राहील, मात्र वैवाहिक आयुष्यात अडचणी आल्यास थोडे नमते घेऊन जोडीदाराचे ऐका. आज काही आरोग्याच्या तक्रारी सतावतील. आजचा दिवस कामाचा ध्यास घेणाऱ्यांसाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांच्या कष्टाचे चीज होईल. आई-वडिलांच्या इच्छा पूर्ण कराल.
शुभ उपाय- सकाळी तुळशीची पूजा करा.
शुभ दान- गरजूला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- हिरवा
मकर (Capricorn Horoscope Today): आजचा दिवस फारसा सकारात्मक असणार नाही. आर्थिक बाबी विचारपूर्वक हाताळाव्या लागतील. आज रागावर नियंत्रण ठेवा. शांत आणि स्थिर मनोवृत्तीने घेतलेले निर्णय फायद्याचे ठरतील. प्रेमप्रकरणांमध्ये फारसे समाधान लाभणार नाही. आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता.
शुभ उपाय- सकाळी सूर्याला अर्घ्य द्या.
शुभ दान- गरजूंना अंथरून दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- गुलाबी
कुंभ (Aquarius Horoscope Today): कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असेल. पूर्वीच्या योजनांचे फळ मिळण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी यश लाभेल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. आजूबाजूच्या लोकांकडून सहकार्याचा हात मिळेल. जवळच्या मित्राचा सल्ला भविष्यात फायद्याचा ठरेल.
शुभ उपाय- सकाळी हनुमान चालीसा वाचा.
शुभ दान- काचेच्या वस्तूचे दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लाल
मीन (Pisces Horoscope Today): विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता. व्यवसायात मंदी दिसून येईल. काही आर्थिक समस्या उद्भवतील. त्यामुळे काहीही करताना विचारपूर्वक पावले उचलण्याची आवश्यकता आहे. नवीन काही सुरु करण्याबाबत योजना आखाल. आज शक्यतो गुंतवणूक करणे टाळा.
शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा.
शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- पांढरा