Weight Loss Natural Tips: लॉक डाऊन मुळे घरबसल्या वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचा चहा ठरेल बेस्ट; जाणून घ्या फायदे आणि झटपट रेसिपी

जिऱ्याचा चहाचे वजन कमी करायला होणारे फायदे आणि त्याची झटपट रेसिपी जाणून घेऊयात..

Jeera Tea (Photo Credits: WikiCommons)

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे मागील काही दिवसांपासून देशभरात लॉक डाऊन (Lock Down)  जारी करण्यात आला आहे. ही परिस्थिती 14 एप्रिल पर्यंत तरी अशीच राहणार आहे. अशावेळी अनेकांना आपल्या हेल्थ आणि फिटनेस ची चिंता सतावत आहे. रोज प्रवासात किंवा इतर कारणास्तव होणारी शरीराची हालचाल आता संपूर्ण बंद झाल्यामुळे आणि त्यात भर म्हणजे जिम्स बंद असल्याने वजन वाढण्याची अनेकांना काळजी आहे. अशावेळी निदान खाण्यापिण्याचे पथ्य पाळल्यास तुम्हाला फार वजनाची चिंता करावी लागणार नाही. वजन कमी करायच्या प्रयत्नात  जिऱ्याचा चहा घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. जिऱ्याचे गुणकारी सत्व वजन कमी करायला तर मदत करतातच पण तुमच्या टेस्ट बड्स वर सुद्धा फार मारा होत नाही. अशा या जिऱ्याचा चहाचे वजन कमी करायला होणारे फायदे आणि त्याची झटपट रेसिपी जाणून घेऊयात..

Hair Care Tips: केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यास मदत करेल 'कढीपत्ता'; जाणून घ्या फायदे

जिऱ्याचा चहा वजन कमी करण्यात का ठरतो गुणकारी?

- जिऱ्याच्या चहामध्ये अँटिऑक्सिडंट्स, विटामिन्स आणि मिनरल्स असतात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होते.

-जिऱ्याचा चहामुळे बद्धकोष्टतेसारखा त्रास सुद्धा दूर होतो. मलनिस्सारण नीट झाल्याने शरीरातील अनावश्यक पदार्थ बाहेर फेकले जातात आणि वजनात फरक येतो.

-जिऱ्याच्या चहाने शरीरामध्ये तयार होणारे इंजाइम कार्बोहायड्रेट, फॅट आणि ग्लुकोज या गोष्टी पचवण्यासाठी मदत करतात.

-या चहामुळे अॅसिडिटी अथवा गॅसच्या समस्या असतील तर त्यातून सुटका मिळते

- एकूण काय, तर शरीराची पचनक्रिया सुधारल्याने चरबी किंवा फॅट्स साठून राहत नाही आणि वजन घटण्यास मदत होते.

जिऱ्याचा चहा रेसिपी

-एका भांड्यात जिरे घालून भाजा. मंद आचेवर भाजा

-त्यानंतर त्यावर दीड कप पाणी घाला आणि हे मिश्रण उकळू द्या

-यामध्ये तुम्हाला हवं असल्यास, मध घाला. आणि उकळू द्या

- थोडं आलं सुद्धा टाकू शकता.

- गाळून हा चहा गरमच प्या.

दरम्यान, आजारांची साथ पसरत असणाऱ्या या संकटकाळात सर्वांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी. वजन वाढण्याच्या समस्या आपण सर्व जाणून आहेत, त्यांना तोंड द्यायचे नसेल तर अशा प्रकारे आधीच खबरदारी घेणे कधीही उत्तम ठरेल.

(टीप- संबंधित लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे त्यास वैद्यकीय सल्ला समजू नये)