Self Isolation Meaning: सेल्फ आयोसेलेशन म्हणजे नेमकं काय, यावेळी कोणती काळजी घ्यावी? Qurantine आणि विलगीकरणात 'हा' आहे फरक

मात्र ज्या अर्थाने हे शब्द वापरले जातात त्याचा संदर्भ वेगळा आहे.या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि त्यांच्यातील फरक सविस्तर जाणून घ्या.

Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Self Isolation Meaning in Marathi: कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात आपण काही शब्द वारंवार ऐकत आहोत. Self Isolation, ,Qurantine ही त्याचीच काही उदाहरणे आहेत. अनेकदा हे शब्द एकमेकांना पर्यायी म्हणून वापरले जातात मात्र याचा नेमका अर्थ काय हे आपण जाणता का? सेल्फ आयसोलेशन आणि क्वारंटाईन याचा मूळ अर्थ हा विलगीकरण असाच आहे. मात्र ज्या अर्थाने हे शब्द वापरले जातात त्याचा संदर्भ वेगळा आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सेल्फ आयसोलेशन करण्यास सांगितले जाते, तेव्हा स्वतःच्या रक्षणासाठी सर्वांपासून अंतर राखून लांब राहणे आवश्यक असते. तर कोरोना संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास 14 दिवस क्वारंटाईन केले जाते. हा एक खबरदारीचा पर्याय आहे. या दोन्ही शब्दांचे अर्थ आणि त्यांच्यातील फरक सविस्तर जाणून घ्या. Coronavirus: फक्त एक फोन करा! COVID-19 बाबतची शंका घरबसल्या दूर करा

सेल्फ आयसोलेशन म्हणजे काय?

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून लांब राहण्यासाठी हा निर्णय व्यक्तिगत स्तरावर घेतला जातो. यावेळी संबंधित व्यक्ती कोणाच्याच प्रत्यक्ष संपर्कात राहू शकत नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तींना शक्यतो स्वतःला विलगीकरणात ठेवण्यास सांगितले जाते.

Qurantine म्हणजे काय?

कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने खबरदारीचा पर्याय म्ह्णून 14-दिवसाच्या कालावधीसाठी विलगीकरणात राहण्यास सांगितले जाते त्याला क्वारंटाईन असे म्हंटले जाते. यावेळी अगदी गंभीर परिस्थिती नसल्यास आपण आपल्या कुटुंबासह किंवा एका खोलीत अन्य व्यक्तीसोबत राहू शकता. यावेळी आपल्या आरोग्याच्या काळजीसाठी वेगळा बेड आणि स्वतंत्र बाथरूम वापरण्यास सांगितले जाते. मास्क वापरा, हात धुवा अशा नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. क्वारंटाईन मध्ये सुद्धा होम क्वारंटाईन आणि हॉस्पिटल क्वारंटाईन असे दोन पर्याय आहेत. नावानुसारच या शब्दांचे अर्थ आहेत.

सेल्फ आयसोलेशन आणि Qurantine मधील फरक

या दोन्ही मध्ये असताना लोकांच्या संपर्कात यायचे नसते. सेल्फ आयसोलेशन मध्ये असताना मात्र अगदी एकट्याने राहणे आवश्यक असते. तर क्वारंटाईन मध्ये आपण अगदी मोजक्या लोकांमध्ये राहू शकता. सार्वजनिक ठिकाणी फिरणे मात्र दोन्ही मध्ये निषिद्ध आहे.

दरम्यान, स्वतःचे रक्षण करण्यासाठी या दोन पर्यायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. देशभरात 3 मे पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लॉक डाऊन जारी केले आहे, आवश्यकता नसल्यास कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन लोकांना सांगण्यात आले आहे. देशात सध्या 27,892  कोरोना रुग्ण आहेत यापैकी 872 मृत्यू झाले आहेत अशावेळी काळजी बाळगणे हा एकमेव पर्याय सामान्य जनतेच्या हातात आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ZIM vs AFG 1st ODI 2024 Live Streaming: टी-20 नंतर झिम्बाब्वे-अफगाणिस्तान वनडे मालिकेत येणार आमनेसामने, आज खेळवण्यात येणार पहिला सामना; तुम्ही 'येथे' पाहून घ्या सामन्याचा आनंद