Neuroendocrine Tumor: इरफान खान यांच्या मृत्यूचे कारण ठरला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर! जाणून घ्या हा आजार कसा होतो, त्याचे लक्षण आणि उपचार

आज या आजारामुळे त्याचे निधन झाले, या आजाराविषयी त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार या संबंधित सविस्तर जाणून घेऊयात..

इरफान खान (Photo Credits : Facebook)

Neuroendocrine Tumor: बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irfan Khan) याचे आज वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. काल, 28 एप्रिल रोजी काहीश्या प्रकृती अस्वास्थ्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते, मागील दोन वर्षांपासून इरफान खान हे न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर (Neuroendocrine Tumorया गंभीर आजाराशी लढा देत होते. 2018 मध्ये या आजाराचे निदान झाल्यावर दोन वर्ष त्यांच्यावर युके मध्ये उपचार सुरु होते. मध्यंतरी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती याच काळात त्याने अंग्रेजी मिडीयम (Angrezi Medium)  या सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. मात्र आता हाच त्रास पुन्हा उद्भवू लागल्याने आणि त्यात कोलोन इन्फेसक्शनची (Colon Infection)  भर पडल्याने त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला. या न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर  आजाराविषयी त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार या संबंधित सविस्तर जाणून घेऊयात.. इरफान खान यांचे निधन हे जागतिक सिनेमाचे नुकसान! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी ट्विट मार्फत वाहिली श्रद्धांजली

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर म्हणजे काय?

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर हा एक दुर्लभ आजार आहे. हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. बहुतांश वेळा हा आजार फुफ्फुसे, रेक्टम, अपेंडिक्स, छोटे आतडे, अग्राशय याठिकाणी हा ट्युमर होऊ शकतो. हार्मोन वाहक तसेच मज्जातंतूचे केंद्र असणाऱ्या सेल्सना हा ट्युमर होतो. हा अनेकदा कर्करोगाच्या व्यक्तिरिक्त सुद्धा होऊ शकतो. यातून पुढे कर्करोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. याची वाढ हळूहळू होते. Irrfan Khan Dies: इरफान खान यांना 'या' एका व्यक्तिसाठी जगायची इच्छा होती; शेवटच्या Interview मध्ये सांगितलेल्या गोष्टी वाचा

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर होण्याची कारणे

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर हा दुर्लभ आजार काही वेळा अनुवांशिक सुद्धा पसरू शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना याचा धोका असतो. शरीराची सतत धावपळ करणे, आराम न देणे उन्हात काम करणे या परिस्थितीत हा धोका वाढतो.(इरफान खान यांच्या निधनावर अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, अरविंद केजरीवाल, सुप्रिया सुळे यांच्या सहित 'या' दिग्गजांनी व्यक्त केला शोक)

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर ची लक्षणे

न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर चा उपचार कसा होतो

या उपचारात साधारण चार पर्याय असतात. सर्वात प्राथमिक म्हणजे हा ट्युमर हटवण्यासाठी ऑपरेशन केले जाते. किंवा मग मेडिकल ऑन्कोलॉजी मधील कीमोथेरेपी, हार्मोन थेरेपी, टारगेटेड थेरेपी चा वापर केला जातो. यामध्ये तिसरा पर्याय म्हणजे रेडिएशन थेरपी चा वापर करतात, जर का ट्युमर शरीरात पसरला असेल किंवा जिथे सर्जरी शक्य नाही तिथे पोहचला असेल तर ही थेरेपी वापरली जाते. चौथा पर्याय म्हणजे गैस्ट्रोएंट्रोलॉजी, जिसकी जरूरत तब पड़ती है जब जीआई ट्रॅक मध्ये येणारे अडथळे दूर करायचे असतात.

दरम्यान, इरफान खान यांना अगदी शेवटच्या टप्प्यात कोलोन इन्फेक्शन सुद्धा झाले होते. कोलोन मार्गात बॅक्टेरिया, खराब पाणी गेल्याने हा प्रकार होतो. हा फार गंभीर आजार नाही मात्र इरफानच्या बाबत ट्युमर असताना हा आजार झाला असल्याने त्याचे परिणाम सुद्धा गंभीर झाले होते.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. लक्षणांच्या बाबत अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif