Healthy Laddu Recipes: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गाजर, ड्रायफ्रूट्सपासून बनवलेले 'हे' पौष्टिक लाडू अवश्य खा, पाहा रेसिपीज
त्यात अळीव, खजूर, गाजर यांसारखे गोष्टी अनेकांना अशीच खायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही त्यापासून छान स्वादिष्ट आणि पौष्टिक असे लाडू बनवले तर लोक आवडीने खातील.
पावसाळा म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणारा ऋतू. यामुळे बाहेरचे खाणे टाळावे, पाणी उकळून प्यावे असे अनेक सल्ले डॉक्टरांकडून दिले जातात. त्यातच यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढविण्याची गरज आहे हे एव्हाना सर्वांनाच कळाले असेल. यासाठी भाज्या, फळे खाणे अनेकांनी सुरु केले आहे. पण या सोबतच मोठ्यापासून लहानांना आवडेल असा एक पदार्थ आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास आणि तुम्हाला सुदृढ ठेवण्यास मदत होईल तो म्हणजे 'लाडू'. (Laddu)
लाडू हा एक असा पदार्थ आहे जो प्रत्येकाला आवडतोच. त्यात अळीव, खजूर, गाजर यांसारखे गोष्टी अनेकांना अशीच खायला आवडत नाही. अशा वेळी तुम्ही त्यापासून छान स्वादिष्ट आणि पौष्टिक असे लाडू बनवले तर लोक आवडीने खातील.
पाहा अशा हटके लाडवाच्या रेसिपीज:
गाजराचे लाडू
नाचणीचे लाडू
ड्रायफ्रूट्स लाडू
अळीवाचे लाडू
खजूराचे लाडू
काय मग हे व्हिडिओ पाहून तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याखेरीज राहणार नाही. पण त्यासोबतच हे लाडू खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल कारण यामधून आवश्यक ती व्हिटॅमिन तुमच्या शरीराला मिळतील.