Happy Gatari 2023 Messages In Marathi: गटारी अमावस्येनिमित्त HD Greetings, Images, Wishes, Jokes आणि Memes द्वारे मित्र-परिवारास द्या मजेशीर शुभेच्छा!
तुम्ही देखील या दिवशी आपल्या मांसहारप्रेमी मित्र-मैत्रिणींना हे हटके मेसेज पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील मेजेस मोफत डाऊनलोड करू शकता.
Happy Gatari 2023 Messages In Marathi: महाराष्ट्रात गटारी अमावस्या मराठी दिनदर्शिकेनुसार आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिन्यात, पुढील 40 दिवस लोक दारू आणि मांसाहार सोडतात. त्यामुळे अमावस हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस आहे ज्या दिवशी बहुतेक लोक मांस आणि दारू पितात. यावेळी गटारी अमावस्या 17 जुलैला साजरी होणार आहे. या दिवसानंतर महाराष्ट्रात श्रावन महिन्याची सुरुवात होते. महाराष्ट्रात श्रावन उत्तर भारतातनंतर 15 दिवसांनी सुरू होतो. भक्त पवित्र श्रावन विधी आणि प्रथा पाळतात. श्रावणात लोक मांस आणि मद्य सोडून शुद्ध अन्न खातात.
गटारी अमावस्येनंतर श्रावन सुरू होतो. यानंतर लोक मांसाहार, अल्कोहोलयुक्त पेये आणि कांदा आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ वर्ज्य करतात. त्यामुळे महिना सुरू होण्यापूर्वी लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात गटारी म्हणून साजरा केला जातो जो श्रावन अमावस्येच्या आधी येतो. गटारीनिमित्त लोक सोशल मीडियाद्वारे एकमेकांना HD Greetings, Images, Wishes, Jokes आणि Memes द्वारे मजेशीर मेसेज पाठवतात. तुम्ही देखील या दिवशी आपल्या मांसहारप्रेमी मित्र-मैत्रिणींना हे हटके मेसेज पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील मेजेस मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gatari Amavasya 2023 in Maharashtra: महाराष्ट्रात कधी साजरी केली जाईल गटारी अमावस्या ? मांसाहार प्रेमीसाठी मटण आणि चिकणच्या खास रेसिपी, गटारीसाठी नक्कीच बनवा)
मराठी लोक श्रावनाच्या स्वागतासाठी गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमावस्या हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस असतो. गटारीच्या दिवशी लोक आपल्या जवळच्या मित्र आणि प्रियजनांसोबत रात्री मधुर मांसाहारी पदार्थ आणि पेयांचा आनंद घेतात.