Ganesh Visarjan 2020: मुंबईतील केवळ 'या' मंडळांच्या गणेश मूर्तींचे समुद्रात होणार विसर्जन, वाचा सविस्तर

त्यानंतर आज 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन व्हावे यासाठी मुंबईतील (Mumbai) ठराविक गणेश मंडळांना समुद्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे.

गणपती विसर्जन (Photo credits: Wikimedia Commons)

गेले 10 दिवस अनेक गणेश भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचे आज अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2020) निमित्त विसर्जन केले जाईल. यंदा कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनचे (Lockdown) सावट गणेशोत्सव आणि गणेश विसर्जनावर (Ganesh Visarjan) पाहायला मिळाले. मात्र गणेशभक्तांच्या श्रद्धेचा मान राखत हा सण आनंदाने आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. याआधी दीड, पाच, सात दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन झाले. त्यानंतर आज 10 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमावलीचे पालन व्हावे यासाठी मुंबईतील (Mumbai)  ठराविक गणेश मंडळांना समुद्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबईत जितके धुमधडाक्यात गणरायाचे आगमन होते तितकेच जल्लोषात विसर्जन केले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे या आनंदावर विर्जन पडले. त्यामुळे मुंबईतील गिरगाव, ग्रँट रोड, मरिन लाईन्स, चिराबाजार आणि आसपासच्या परिसरातील गणेश मूर्तींचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी अॅपद्वारे विशेष नोंदणी करण्यात आली आहे. Anant Chaturdashi Ganesh Visarjan: अनंत चतुर्दशी गणेश विसर्जनाच्या दिवशी घरच्या घरी बाप्पाच्या निरोपाची उत्तर पूजा, मंत्र, विधी घ्या जाणून!

घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन घराच्या घरी करण्यावर अधिक प्राधान्य द्यावे. घरगुती गणेश मुर्त्यांचे विसर्जन घरातच बादलीत किंवा ड्रममध्ये करावे असे शासनाकडून सांगण्यात आले आहे. आपल्या घरापासून 2 किमीच्या अंतरावर असलेल्या विसर्जन घाटावरच गणेशमुर्तीचे विसर्जन करावे. गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात किंवा पाण्यात उतरण्यास भाविकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

गणपती विसर्जनासाठी महापालिकेच्या 24 विभागांमध्ये सुमारे 170 कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे कृत्रिम तलाव लगत राहणाऱ्या भाविकांना नैसर्गिक विसर्जन स्थळांवर जाण्यास मनाई आहे. त्यामुळे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.