2020 Holiday Calendar: जाणून घ्या कधी आहेत सुट्ट्या आणि कसे करू शकता तुम्ही नवीन वर्षातील फिरण्याचे प्लॅन्स

किती सुट्ट्या तुम्ही घेऊ शकता आणि कसे फिरणायचे नवनवे प्लॅन्स बनवू शकता याबद्दल आम्ही सांगणार आहोत या 2020 च्या Holiday Calendar मधून.

2020 Calendar (Photo Credits: Pixabay)

New Year Holiday Calendar: 2019 या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात आपण येऊन पोहोचलो आहोत. त्यामुळे आता येणार नवं वर्ष हे कसं असणारा? त्यात किती सुट्ट्या तुम्ही घेऊ शकता आणि कसे फिरणायचे नवनवे प्लॅन्स बनवू शकता याबद्दल आम्ही सांगणार आहोत या 2020 च्या Holiday Calendar मधून.

जानेवारी: 2020 मधील पहिल्याच महिन्यात तुम्ही फिरण्याचे काही प्लॅन्स ठरवू शकता कारण अनेक सुट्ट्या या बुधवारी येतात. नवीन वर्षातील पहिला दिवस बुधवारी येत असल्याने तुम्ही या सुट्टीला जोडून दोन सुट्ट्या घेतल्या तर शनिवार आणि रविवार मिळून टोटल 5 दिवसांचा प्लॅन तुम्ही आखू शकता. तसेच मकर संक्रात आणि पोंगल 15 जानेवारी (बुधवार) रोजी येतात. परंतु, यावर्षी 26 जानेवारी रविवारी येत असल्याने त्याची एक्सट्रा सुट्टी मात्र गेली.

फेब्रुवारी: या महिन्यात 19 फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि  21 तारखेला म्हणजेच शुक्रवारी महाशिवरात्र आहे. त्यामुळे या महिन्यातही एखादा 5 दिवसांचा व्हेकेशन प्लॅन हमखास बनावट येऊ शकतो.

मार्च: मार्च महिन्यात दोन सुट्ट्या आहेत. होळीची सुट्टी 10 मार्च रोजी म्हणजेच मंगळवारी तर गुढी पाडवा 25 मार्च म्हणजेच बुधवारी आहे.

एप्रिल: या महिन्यात तुम्ही अनेक प्लॅन्स बनवू शकता कारण या महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी राम नवमी येते. त्यानंतर लगेचच चार दिवसांनी म्हणजेच 6 तारखेला महावीर जयंती आहे. इतकंच नव्हे तर 10 एप्रिल रोजी गुड फ्रायडे आहे आणि 12 तारखेला इस्टर तर 13 तारखेला बैसाखी आहे.

मे: 2020 मध्ये 1 मे शुक्रवारी आला असल्याने ही कामगार दिनाची सुट्टी घेत तुम्ही 3 दिवसांचा प्लॅन करू शकता. पण मोठा प्लॅन करायचा असेल तर 7 मे (गुरुवार) रोजी बुद्ध पौर्णिमा आहे. पुन्हा 25 मे म्हणजेच सोमवारी ईद-उल-फितर असल्याने तीन दिवसाची सुट्टी मिळणार आहे.

ऑगस्ट: ऑगस्ट महिना सुट्ट्यांसाठी खास ठरू शकतो कारण या महिन्याच्या पहिल्याच दिवशी बकरी ईद आहे. त्यानंतर 12 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी, 13 तारखेला रक्षाबंधन आणि स्वतंत्र्य दिन 15 ऑगस्ट अशा ३ सुट्ट्या लागून असतील. पुन्हा 22 ऑगस्ट रोजी विनायक चतुर्थी आहे तर त्याच्या दुसऱ्या दिवशी मोहरम आहे. तसेच 31 ऑगस्टला ओणम आहे.

ऑक्टोबर: या महिन्याची सुरुवात गांधी जयंतीपासून होते कारण 2 ऑक्टोबर रोजी शुक्रवार असल्याने तुम्ही 3 दिवसांचा प्लॅन ऑक्टोबरमध्ये सुद्धा करू शकता.

नोव्हेंबर: हा महिना नेहमीच दिवाळीमुळे खास ठरतो. 14 नोव्हेंबर रोजी दिवाळी असून 15ला जोडून सुट्टी घेऊ शकता. तसेच 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी सुट्टी घेऊन तुम्ही 3 दिवसांचे प्लॅन करता येऊ शकतो कारण 30 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंतीची सुट्टी असणार आहे.

डिसेंबर: या महिन्यात सुद्धा तुम्ही एखादी छोटी ट्रिप प्लॅन करूच शकता कारण नाताळची सुट्टी आली आहे शुक्रवारी. त्यामुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जोडून घेतल्यास तुमची तीन दिवसांची सुट्टी फिक्स .