Swami Vivekananda Jayanti 2023: स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आयुष्य बदलणारे त्यांचे काही प्रेरणादायी विचार, पाहा
दरम्यान,आज त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे अमूल्य विचार जाणून घेणार आहोत, जो तुम्हाला जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण देईल..., पाहा
Swami Vivekananda Jayanti 2023: भारताला लाभलेल्या थोर विचारवंतांच्या शिकवणीमुळे आपला भारत देश घडला. भारतात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, परंतु त्यांचे विचार आजही प्रेरणा देतात. थोर विचारवंतांच्या यादीतील महत्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद हे आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रत्येक व्यक्तीवर विशेष प्रभाव पडतो. 12 जानेवारी 1863 साली नरेंद्रनाथ यांचा जन्म झाला होता. पुढे स्वामी विवेकानंद स्वामी रामकृष्ण परमहंस यांना भेटले आणि त्यांनी परमहंस यांना आपले गुरु मानले.रामकृष्ण यांनी नरेंद्र यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव स्वामी विवेकानंद केले. स्वामी विवेकानंद यांनी भारताच्या कल्याणासाठी आणि जनतेचा उद्धार करण्यासाठी त्यांचे आयुष्य समर्पित केले. स्वामी विवेकानंद यांची जयंती 12 जानेवारी रोजी आहे. दरम्यान,आज त्यांच्या जयंती निमित्त आपण त्यांचे अमूल्य विचार जाणून घेणार आहोत, जो तुम्हाला जगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोण देईल...
पाहा, स्वामी विवेकांनद यांचे प्रेरणादायी विचार
स्वामी विवेकानंद यांचे अमूल्य विचार नक्कीच जीवनात कधी तरी तुमच्या कमी येतील, त्यांचे विचार जीवनाला तुमच्या जीवनाला सकारात्मक दृष्टीकोण देईल, अशा या थोर विचारवंतास कोटी कोटी प्रणाम!