Swami Samarth Prakat Din Images 2026: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!

स्वामी समर्थ प्रकट दिन 2026 या वर्षी 20 मार्च रोजी साजरा होणार आहे. या लेखात या मंगल दिनाचे महत्त्व, तारीख आणि भक्त करत असलेल्या विशेष सेवेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, स्वामी समर्थ प्रकट दिन

मुंबई: श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो. यावर्षी म्हणजेच २०२६ मध्ये, स्वामी समर्थ प्रकट दिन शुक्रवार, २० मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. चैत्र शुद्ध द्वितीया या तिथीला स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये प्रथम प्रकट झाले होते, अशी श्रद्धा आहे. या निमित्ताने अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर आणि राज्यातील विविध स्वामी मठांमध्ये विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रकट दिनाचे महत्त्व आणि इतिहास

स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार, १८५६ मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्याहून अक्कलकोटमध्ये आले. त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात प्रथम मुक्काम केला होता. स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. कर्दळीवनातून प्रकट होऊन त्यांनी आसेतुहिमाचल भ्रमण केले आणि शेवटी अक्कलकोटला आपली कर्मभूमी बनवले. "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे," हे त्यांचे अभय वचन आजही लाखो भक्तांना आधार देते.

स्वामी समर्थांचा प्रकट दिनचे औचित्य साधून तुम्ही स्वामी समर्थांच्या भक्तांना सोशल मीडियाद्वारे Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा
स्वामी समर्थ प्रकट दिन शुभेच्छा
स्वामी समर्थ प्रकट दिन स्टेटस

स्वामी समर्थ पूजेचा मुहूर्त आणि विधी

२० मार्च २०२६ रोजी सकाळी लवकर उठून स्नान उरकल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला अभिषेक घातला जातो. त्यानंतर गंध, अक्षता आणि विशेषतः स्वामींना प्रिय असलेली तुळस अर्पण केली जाते. दुपारी १२ वाजता स्वामींच्या प्रकट दिनाचा मुख्य सोहळा पार पडतो, ज्यामध्ये पाळणा गायला जातो आणि आरती केली जाते. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे आणि 'माधुकरी' वाढणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.

अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी

प्रकट दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून भाविकांच्या सुविधेसाठी दर्शन रांगा, पिण्याचे पाणी आणि महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. अक्कलकोटमधील सर्व मठांना विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement