Netaji Subhash Chandra Bose Jayanti 2023 Quotes: सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त Messages, WhatsApp Status, Wallpapers, Images शेअर करत द्या प्रेरणादायी शुभेच्छा
नेताजींच्या जयंती निमित्त तुम्ही हे विचार तुमच्या मित्र मैत्रिणींसह तुमच्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करु शकता.
Netaji Subhash Chandra Bose Jayanti Quotes in Marathi: नेताजी सुभाष चंद्र बोस हे नाव कानावर पडलं तरी शौर्य, बहादूरी, चिकाटी, धैर्य अशी प्रेरणादायी भावना आपसुकचं मनात येते. कायम प्रेरणेचे स्त्रोत असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारीला जयंती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी हे महत्वाच्या नावापैकी एक. देशाने नेताजीसाठी काय केलं यापेक्षा नेताजीने देशासाठी आपलं सर्वस्व वाहून दिलं आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे व्यक्तीमत्व अजरामर झालं. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ आणि ‘जय हिंद’ नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसा येथे झाला. त्यांचा जन्मदिवस सुभाषचंद्र बोस जयंती म्हणून साजरा केला जातो. तरी नेताजींच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपण्यासाठी आम्ही नेताजींचे विचार तुमच्यासाठी घेवून आलो आहे. नेताजींच्या जयंती निमित्त तुम्ही हे विचार तुमच्या मित्र मैत्रिणींसह तुमच्या नातेवाईकांना आणि जवळच्या व्यक्तींना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेअर करु शकता.
1. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
2. डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
3.भिक मागून कधीनी कोणाला स्वातंत्र्य प्राप्त करता येणार नाही, ते ताकदीनेच मिळवले पाहिजे, आणि त्याची किंमत रक्त ही आहे.
– नेताजी सुभाषचंद्र बोस
4. “स्वातंत्र्याच्या या युद्धामध्ये आपल्यात कोण टिकेल हे मला ठाऊक नाही! पण मला हे माहित आहे, शेवटी विजय आपलाच असेल!”–नेताजी सुभाषचंद्र बोस
5. “राष्ट्रवाद हा मानवजातीचा सर्वोच्च आदर्श आहे, सत्य शिव आणि सुंदर यांनी प्रेरित केले आहे“– नेताजी सुभाषचंद्र बोस